पत्रकार वारिशे यांच्या हत्त्येचा लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाकडून निषेध
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
11 Feb 2023, 8:36 AM
अकोला- राजापूर येथील पत्रकार शशिकांत यांच्या हत्त्याप्रकरणाची जलद चौकशी होऊन त्यांच्या कुटूंबाला न्याय देण्यात यावा .या अपराधातील हल्लेखोरांवर कठोर कार्यवाही व्हावी अशी मागणी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेकडून संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख,निंबेकर यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली असून या घटनेचा मिश्र निषेध करण्यात आला आहे.
लोकशाहीमध्ये समाजासाठी अनुचित ठरणारे आणि निरोगी समाजजीवनाला घातक ठरणारे प्रकार आणि प्रशासनातील अनैतिक,भ्रष्ट प्रवृत्तींविरूध्द लेखणी चालविणाऱ्या पत्रकारांवर हल्ले किंवा त्यांना संपविण्याचे प्रकार घडत आहेत.राष्ट्राच्या आधारस्तंभाला कमकुवत करण्याचे हे प्रकार चिंताजनक आहेत असे मत या पत्रात व्यक्त करण्यात आले आहे. राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या हत्त्येचा लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख,निंबेकर,( अकोला)कार्याध्यक्ष बाळासाहेब आंबेकर ( सातारा),उपाध्यक्ष प्रदिपजी खाडे,किशोर मानकर,राजेन्द्र देशमुख,( अकोला)विजयराव देशमुख,( बुलढाणा)नागेश कांगणे(मेहकर) डॉ. अनुपकुमार राठी,सिध्देश्वर देशमुख,अंबादास तल्हार,सौ.जया भारती अॕड.राजेश जाधव,अॕड राजेश कराळे,प्रा.राजाभाऊ देशमुख,( अकोला) सुर्यकांत तोडकर ( कोल्हापूर)प्रा.डॉ.संतोष हूशे,पुष्पराज गावंडे (अकोला)डॉ.रविन्द्र भोळे(पूणे), डॉ.शंकरराव सांगळे,किशोर मुटे,( वर्धा)पंजाबराव देशमुख ( खामगांव) सौ.स्मिता गायकवाड( मुंबई)अकोला जिल्हाध्यक्ष मोहन शेळके, बुलढाणा जिल्हाध्यक्ष स्वप्निल देशमुख,किशोर मुटे ( वर्धा) पंकज राऊत,शेख आशाद जगदिशप्रसाद करोतिया ( बोईसर)सर्व विभागीय जिल्हा व महाराष्ट्रातील पत्रकार पदाधिकाऱ्यांनी या घटनेचा तिव्र शब्दात निषेध केला आहे. शब्दात निषेध केला आहे.
Post Views: 132