वर्तमान काळात ग्राहकांनी अधिक जागृत होणे काळाची गरज: मा. किशोर मुटे
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
07 Feb 2023, 10:11 AM
हिंगणघाट : श्री साईबाबा लोकप्रबोधन कला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाअंतर्गत आयोजित विशेष श्रमसंस्कार निवासी शिबिर वेणी येथे आजच्या बौद्धिक सत्रात श्री. किशोर मुटे यांनी आज ग्राहक संरक्षण यासंदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. गणेश बहादे होते.
वर्तमान काळात ग्राहकाची वेगवेगळ्या माध्यमातून फसवणूक होत आहे आणि त्याबाबत कशा पद्धतीने ग्राहकाने जागृत राहून आपली फसवणूक टाळता येऊ शकते व जर एखाद्या प्रसंगी फसवणूक झाली तर त्याबाबत ग्राहक संरक्षण अधिनियम 2019 या अंतर्गत ग्राहकांना कशाप्रकारे संरक्षण प्राप्त झालेले आहे या संदर्भाने त्यांनी विस्तृत मार्गदर्शन करत असताना वर्तमान काळामध्ये इलेक्ट्रॉनिक्स मीडिया च्या युगात ग्राहकांनी अधिक सजत किंवा अधिक जागृत होणे ही काळाची गरज आहे असे मत याप्रसंगी व्यक्त केले.या कार्यक्रमाला पत्रकार श्री धनराज हुलके, डॉ. पंकज मून, माझी विद्यार्थी सचिन महाजन उपस्थित होते . यावेळी कार्यक्रमाचे संचालन श्री चेतन साटोणे यांनी केले तर आभार कु. दर्शना शिवणकर हिने केले.
या वेळी राष्ट्रीय सेवा योजना निवासी शिबिरातील सर्व स्वयंसेवक जयश्री चौधरी, आचल खिरटकर, पल्लवी पिंपळशेंडे, स्नेहल अवचट, हर्शदा महाजन, अभय पोहाने, रुचीता वेले, दिव्याभारती अवचट, सचिन कोळसे, स्वाती सुपरे, स्नेहल कामटकर, नेहा येलके, रेशम खिरटकर, निखिता चौधरी, उज्वला गुरुनुले, साक्षी लोहकरे, प्रफुल शिंदे, रिक्की मुन, बन्नू लोहकरे, प्रियंका बोंडे, सुरज मडावी, समीर पवार व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
Post Views: 129