छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणारे राज्यपाल कोश्यारीचा जोडे मारून निषेध
संग्रामपूर तालुका शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
22 Nov 2022, 10:36 AM
(स्वप्निल देशमुख) संग्रामपूर : राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोशारी व भारतीय जनता पार्टीचे (BJP) राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले. याचे पडसाद राज्यभर उमटत असून संग्रामपूर तालुक्यात देखील संग्रामपुर तालुका शिवसेनेच्या वतीने राज्यपाल भगतसिंह कोशारी त्याचबरोबर सुधांशू त्रिवेदी यांच्या प्रतिमेस जोडे मारून वरवट बकाल बस स्थानकावर 21 नोव्हेंबर रोजी निषेध करण्यात आला .
शिवसेना व शिव प्रेमींनी केला जात असलेल्या या निषेध आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच शिवप्रेमी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी निषेधकर्त्यांतर्फे राज्यपाल भगतसिंह कोशारी त्याचबरोबर सुधांशू त्रिवेदी यांच्या विरोधात घोषणाबाजी करून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
या निषेध आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच शिवप्रेमी संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारीत यावेळी उपस्थित होते. यावेळी निषेधकर्त्यांतर्फे राज्यपाल भगतसिंह कोशारी त्याचबरोबर सुधांशू त्रिवेदी यांच्या विरोधात घोषणाबाजी करून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
या आंदोलनात शिवसेना तालुकाप्रमुख रवी झाडोकार, अमोल ठाकरे शिवसेना किसानसेना तालुकाप्रमुख, शुभम घाटे शहर प्रमुख, कैलाश कडाळे उपतालुकाप्रमुख, निलेश झाडोकार, राहुल मेटांगे, विशाल बांगर, प्रल्हाद अस्वार ,गोपाल पाटील चोपडे, भैय्या घिवे, प्रशांत इंगळे, भगवान पवार, शिवप्रेमी चेतन बकाल अंकुश कड तसेच संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views: 240