प्रत्येक विधानसभा मतदारसंघात मोबाईल व्हॅनद्वारे इव्हीएम विविपॅट यंत्रांबाबत जनजागृती करणार
जिल्हा निवडणूक कार्यालयाची विशेष मोहिम
अकोला : आगामी विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने मतदारांमध्ये मतदान यंत्रांच्या वापराबाबत व मतदानाचा हक्क बजावण्याबाबत जागरूकता निर्माण होण्यासाठी इव्हीएम विविपॅट यंत्रांबाबत जनजागृती मोहिम दि. 10 सप्टेंबर ते दि. 09 ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे.
या मोहिमेअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय अकोट, बाळापूर, अकोला, मुर्तिजापूर तसेच उपजिल्हाधिकारी (महसूल), जिल्हाधिकारी कार्यालय या कार्यालयाच्या ठिकाणी इव्हीएम प्रात्यक्षिक केंद्रे (इव्हीएम डेमोस्ट्रेशन सेंटर इडीसी) निश्चित करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे, प्रत्येक विधानसभा मतदारसंघात निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार दोन मोबाईल व्हॅनद्वारे प्रत्येक गाव, मतदान केंद्र स्थळावर मतदारांना मतदान यंत्रांची (ईव्हीएम व विविपॅट) प्रात्यक्षिके दाखविण्यात येणार आहेत. प्रात्यक्षिकांदरम्यान मतदारांना इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राव्दारे मतदानाचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे.
जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघनिहाय ईव्हीएम व विविपॅट जनजागृती व प्रात्यक्षिकांचे वेळापत्रक https://akola.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
त्याचप्रमाणे, ही सुविधा सामान्य निवडणूक शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे तसेच उपविभागीय अधिकारी कार्यालय, अकोट, बाळापूर, अकोला, मुर्तिजापूर व उपजिल्हाधिकारी (महसूल) जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे उपलब्ध आहे. अकोला जिल्ह्यातील सर्व नागरीकांनी ईव्हीएम प्रात्यक्षिक केंद्रे तसेच मोबाईल व्हॅनव्दारे केल्या जाणा-या प्रात्यक्षिकांच्या ठिकाणी मतदान यंत्रांचे अवलोकन करुन प्रत्यक्ष मतदान करण्याचा अनुभव घ्यावा तसेच मतदान यंत्रांच्या प्रचार, प्रसिध्दी व जनजागृती मोहिमेमध्ये आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे.
Post Views: 77