सरेवाडीत सावित्रीबाई फुले जयंती बालिका दिन साजरा
पुणे : आज सोमवार दिनांक 03/01/2022 रोजी जि.प.प्राथमिक शाळा सरेवाडी येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती बालिका दिन म्हूणन साजरी करण्यात आली.
शाळेतील मुलींनी सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा केलेली होती. बालिकेच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. लेक वाचावा,लेक शिकवा
*शिकलेली आई,घर पुढे नेई
*मुलीचे शिक्षण,प्रगतीचे लक्षण*
याप्रमाणे घोषणा देण्यात आल्या.विद्यार्थ्यांकडून सावित्रीबाई फुले च्या जीवनावर आधारित निबंध लेखन करण्यात आले. सावित्रीबाई फुले यांचा जीवनपट विजयकुमार शेटे यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडला.
शाळेचे मुख्याध्यापक बापूराव दराडे यांनी महिला ग्रामस्थांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.
विद्यार्थिनींनी वेशभूषेतून सावित्रीबाईंच्या जीवनातील छोटे छोटे प्रसंग सादर केले.
कार्यक्रमाला उपस्थित शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या हिराबाई ठोकळ,अनिताबाई ठोकळ, गिताबाई ठोकळ,कुसूम ठोकळ पालकसदस्या उपस्थित होत्या. शेवटी खाऊ वाटप करण्यात आला.
Post Views: 642