समाजातील वंचित व उपेक्षित घटकांना सहकार्य करणे आवश्यक आहे


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  10 Feb 2026, 9:46 AM
   

कोल्हापूर : मिरजकर तिकटी कोल्हापूर येथील अंध विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी सहकार्य करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सुरेश केसरकर यांनी केले.
         सामाजिक व अध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत असलेले बाजीराव कपले यांनी प्रतीवर्षीप्रमाणे या वर्षीही सेवाभाव जपत अंधशाळेला आर्थीक सहाय्य केले.   यावेळी कामगार कल्याण अधिकारी विजय शिंगाडे यांनी, विद्यार्थ्यांसमवेत संवाद साधण्याबरोबरच या संस्थेच्यावतीने अंध विद्यार्थ्यांना दिले जात असलेले शिक्षण व सेवासुविधा अतिशय उत्तम दर्जाच्या असल्याबद्दल समाधान व्यक्त करून, यापुढील काळात अनेक सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून शाळेला मदत करण्यासाठी आवाहन करण्याचे आश्वासन दिले.
         सामाजिक कार्यकर्ते बाजीराव कपले यांनी आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो, या उदात्त हेतूने कार्यरत असल्याचे सांगितले. त्यांच्या सेवाभावीवृत्तीचे कौतुक करीत संघसेन जगतकर यांनी उपस्थित अंध विद्यार्थ्यांच्या मनात, आम्ही प्रकाश बिजे रुजवित चाललो ! या काव्यपंक्तीनी चैतन्य निर्माण केले. यावेळी गुणवंत कामगार बाळासाहेब कांबळे व रविंद्र कपले उपस्थित होते.
         यावेळी शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत करून, शाळेच्या एकूणच कामकाजाची माहिती दिली व यापुढील काळातही विद्यार्थ्यांना प्रोत्साहन व मार्गदर्शन मिळण्यासाठी समाजातील मान्यवरांनी पुढे आले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.
         यावेळी शाळेचे शिक्षकवृंद व स्टाफ तसेच शाळेतील सर्व अंध विद्यार्थी उपस्थित होते.

    Post Views:  13


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व