गायत्री दीपयज्ञ संपन्न


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  22 Feb 2022, 1:11 PM
   

अकोला : भारतीय संस्कृती ऋषि मुनींची संस्कृती आहे महाराष्ट्र हे संतांची भूमि आहे संत आपल्या दूरदर्शी चिंतनाद्वारे व्यक्ती ,परिवार, समाज, राष्ट्र व विश्व निर्माणासाठी मार्गदर्शन करीत असतात आम्ही सर्वानी आजच्या विज्ञान युगात आध्यात्म विज्ञान साइंटिफिक स्पिरिच्युअलिटी ची महत्ता स्विकारून त्याचा लाभ घ्यावे. गायत्री मंत्राबद्दल एम्स AIIMS वैज्ञानिकांनी विस वर्ष अभ्यास प्रयोग, रिसर्च करून त्याची महत्ता सिध्द करून दाखवली. इंटरनेट, यु ट्युब वरही रिपोर्ट उपलब्ध आहेत. ओंकार साधना गायत्री मंत्र जपाद्वारे ब्रेन मेंदूत अल्फा तरंग निघतात, याचे अनेक फायदे आहेत. 
एकविसाव्या शतकात डिप्रेशन नैराश्य , मानसिक आजार खूप वाढत  आहे. हे दुर करण्यासाठी सामुदायिक प्रार्थना, ध्यान, गायत्री मंत्र जप, नादयोग साधना, ओंकार साधना, योग प्राणायाम सूर्यनमस्कार, तुळसी सेवन, स्वाध्याय सत्संग हे संजीवनी औषधे आहेत. असे प्रतिपादन गायत्री परिवार चे डॉ अजय उपाध्याय यांनी न्यू तापडिया नगर येथे आयोजित त्रिदिवसीय सामुहिक श्री गजानन विजय ग्रंथ पारायण पूर्णाहुती व आयोजित गायत्री दीप प्रसंगी केले. देव दक्षिणेत सर्वांनी हात उंचावून एक  प्रगतीत बाधक असा वाईट अवगुण सोडवायचे व  चांगले सद्गुण धारण करावयाचे संकल्प घेतले. तीन झाडं लावून त्याचे संवर्धन करावयाची शपथ घेतली. 
यावेळी दीप यज्ञाचे संचालन व प्रज्ञा गीत भजन नितू दिवनाळे, यामिनीदीदी, अनिता दीदी, प्राची टाकसालकर, पल्लवी चवरे, अनिता दही संध्या टाकसालकर यांनी केले. आभार प्रदर्शन व सफल नियोजन गजानन मालठाणकर व मित्र मंडळ यांनी केले. राष्ट्रवंदनेद्वारे समापन झाले. दोन हजार पेक्षा जास्त लोकांनी महाप्रसाद ग्रहण केले.

    Post Views:  262


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व