अकोला : आज दि २७/२ रोजी प्रसिद्ध कविवर्य वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज ह्यांच्या जयंती निमित्त साजरा होण्याऱ्या मराठी भाषा गौरव दिनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अकोला(पूर्व) च्या पदाधिकार्यांनी स्थानिक अकोला रेल्वेस्थानक येथे जाऊन स्थानक प्रबंधक श्री कवडे ह्यांची भेट घेतली तसेच त्यांना मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या व आज दिवसभर लाऊडस्पीकर वर राजभाषा दिन शुभेच्छा च्या उद्घोषणा व मराठी गाणे वाजविण्याची मागणी केली असता त्यांनी तात्काळ ह्या संदर्भात सूचना केल्या व मराठी राजभाषा दिन शुभेच्छा व मराठी अभिमान गीत वाजणे सुरू झाले.त्यांचे धन्यवाद मानून सर्व पदाधिकारी ह्यांनी अकोला नवीन बस स्थानक येथे आगार प्रमुख श्री पेसोडे ह्यांची भेट घेऊन बस आगार येथे सुद्धा मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा उद्घोषणा व मराठी अभिमान गीत वाजविण्यास सुरुवात केली. ह्याप्रसंगी जिल्हाध्यक्ष पंकज साबळे, जिल्हा सचिव ललित यावलकर, संघटक अरविंद शुक्ला, शहर अध्यक्ष सौरभ भगत, उपशहर अध्यक्ष राजेश पिंजरकर, मुकेश धोंडफळे, विद्यार्थी सेना उपजिल्हाध्यक्ष जय मालोकार, चंदू अग्रवाल, अमोल गवई आदी पदाधिकारी उपस्थित होते.
Post Views: 277