विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा


 संजय देशमुख  04 Jan 2022, 8:55 PM
   

नागपूर : वातावरणात सातत्याने होत असलेल्या बदलाने राज्यात 6 ते 8 जानेवारीदरम्यान अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 6 जानेवारी रोजी उत्तर महाराष्ट्रात तर 7 जानेवारी रोजी उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यात ढगाळ हवामानाची स्थिती राहणार आहे. या दोन दिवसात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. तर शनिवारी 8 जानेवारीला मात्र विदर्भासह मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकणातील काही जिल्ह्यांत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. 8 जानेवारी रोजी हवामान खात्याने बुलडाणा, अमरावती, नागपूर, अकोला आणि वर्धा या पाच जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. संबंधित जिल्ह्यात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.

    Post Views:  493


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व