रोटरी क्लब अकोला ईष्ट चा पदग्रहण सोहळा संपन्न


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  08 Jul 2024, 8:47 AM
   

रोटरी क्लब ऑफ अकोला ईस्ट च्या पदग्रहण सोहळ्याचे मुख्य अतिथी म्हणून रोटेरियन डीजीएन राजेश पाटील, प्रमुख अतिथी म्हणून वुमन फाउंडेशन अमरावतीच्या अध्यक्षा तसेच सामाजिक कार्यकर्त्या गुंजन गोळे, असिस्टंट गव्हर्नर रोटेरियन राजीव बजाज, तसेच व्यासपीठावर सर्व रोटेरीयन 
विद्यमान अध्यक्ष सौ पुनम मुंदडा श्री अशोक जी मुंदडा, श्री रमण राठी, श्री मनोज मालोदे माजी अध्यक्ष मोहित भाला, सौ दिव्या भाला वैजनाथ कोरकणे आदी प्रमुखाची  उपस्थितीत दिनांक ६ जुलै 2024 ला सायंकाळी ७ वाजता माहेश्वरी भवन अकोला येथे दीप प्रज्वलन आणि प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली
     उपस्थित पाहुण्यांचे आणि रोटेरियन पदाधिकारी व सदस्यांचे सौ संध्या मनोज मालोदे यांनी गीत गाऊन स्वागत केले.प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत स्वर्गीय शिवरतनजी जाजू यांच्या सुकन्या नवनियुक्त अध्यक्षा रोटेरियन सौ पुनम अशोकराव मुंदडा यांना मावळते अध्यक्ष रोटेरियन श्री मोहित जी भाला यांनी आनंदाने रीतसर प्रभार सुपूर्द केला. तसेच एडमिन सेक्रेटरी म्हणून रोटेरियन रमण राठी तर प्रोजेक्ट सेक्रेटरी म्हणून मनोज मालोदे आणि अध्यक्षांना रोटरी पीन लावून अतीथींनी सन्मानव प्रभार सोपवला. रोटेरियन डीजीएन डॉक्टर राजेश पाटील यांनी वर्षभरात रोटे.मोहित भाला आणि टीम आणि सदस्यांनी डायलिसिस प्रोजेक्ट, जिल्हा महिला रुग्णालय समोर राबविण्यात येत असलेल्या अमृत भोज प्रोजेक्ट  ची प्रशंशा करून रोटरी क्लब ऑफ अकोला ईस्ट जिल्ह्यात पहिल्या पाच मध्ये येण्याचा सौ. पूनम मुंदडा आणि टीमने प्रयत्न करावा असे आवर्जून सांगितले. तसेच सामाजिक कार्यकर्त्या वूमन फाउंडेशन अमरावतीचे अध्यक्षा सौ. गुंजन गोळे ह्या मदर मिल्क बँक चालवितात,स्व:त च्या मुलांसोबत सहा मुलांना दुध पाजून त्यांना जीवदान दिले,२०११ पासून सरकारी मदत न घेता स्वतःचं घर दार मुलांचं  सोनं विकून आणि लोकसह भागातून एचआयव्ही बाधित 40 मुलांचं त्या संगोपन करीत आहेत एवढेच नाही तर साडेचारशे एचआयव्ही बाधित मुला-मुलींना ज्यांची आई वडील मरण पावले अशा मुलांसाठी शिक्षण आणि लग्न आणि स्वतःच्या पायावर उभे राहीपर्यंत पालकत्व स्वीकारले आहे. जगातील रोटरी क्लब चे सदस्य आणि आपण अकोलाचे रोटेरीयन आपले आयुष्य सुखात जगत असताना समाजातील तळागाळातल्या लोकांना मदत करता ही अभिमानाची बाब आहे, असे सौ.गुंजन ताई आवर्जून म्हणाले. सौ.गुंजन ताईच्या प्रकल्पाला रोटेरियन श्री पसारी यांनी ५००१ रूपये आणि रोटेरियन ब्रिज मोहन चितलांगे यांनी 11000 रुपयाची देणगी दिली.
      तसेच असिस्टंट गव्हर्नर रोटेरियन राजीव जी बजाज यांनी विद्यमान डीजी रोटे.राजेन्दर सिंग खुराणा यांचा संदेश वाचून दाखविला. श्री मोहित भाला यांनी आपल्या प्रास्ताविकातून वर्षभर राबविलेल्या  प्रकल्पाची माहिती दिली. तर सौ पुनमजी मुंदडा यांनी डॉक्टर वाघेला ला यांनी रोटरी क्लब ला  दिलेल्या जागेत रोटरी भवन आणि इतर सर्व प्रकल्प राबविण्यासाठी सर्व रोटेरीयन यांनी मदत करावी यासाठी सर्वांना साकळे घालून हात वर करून समर्थन देण्याचे आवाहन केल्यानंतर  सर्व रोटेरीयन यांनी मदत करण्याचे कबूल केले. कार्यक्रमाला अकोला मधील इतर सर्व रोटरी क्लबचे पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते त्यांचा ही रोटरी क्लब ऑफ अकोला ईस्ट च्या पदाधिकाऱ्यांकडून सत्कार करण्यात आला तसेच ज्यांनी ज्यांनी कार्यक्रमाला मदत केली त्यांचाही बुके देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमानंतर  रोटेरियन संजय जी हेडा आणि सौ.सुनीता हेडा तसेच रोटेरियन मनोज आणि सौ संध्या मालोदे यांच्या लग्न वाढदिवसाचा व रोटेरीयन सुरेश नाथे यांच्या वाढदिवसाचा केक  कापण्यात आला. कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे शिस्तबद्ध संचलन ज्येष्ठ रोटेरियन अँड. श्रीनिवास खोत आणि राजश्री खोत यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रोजेक्ट सेक्रेटरी रोटेरियन मनोज जी मालोदे यांनी केली कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. असे रोटेरियन विजय बाहाकर  कळवितात.

    Post Views:  66


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व