अकोला आश्रमात राष्ट्रसंतांचा पुण्यस्मरण कार्यक्रम संपन्न
अकोला : गुरुमाऊली वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 53 व्या पुण्यस्मरणा निमित्त कार्यजंली प्रतिज्ञा कार्यक्रम श्री गुरुदेव सेवाश्रम अकोला येथे दिनांक 29 30 31 डिसेंबर रोजी संपन्न झाला या कार्यक्रमाचे उद्घाटक लाभले अ.भा श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम चे उपसर्वाधिकारी सन्मा.लक्ष्मणरावजी गमे ज्यांच्याअध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.
जिल्ह्याचे जिल्हासेवा धिकारी रवींद्र दादा मुडंगावकर.सर्व प्रथम दिंवगत लक्ष्करप्रमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजलीची प्रस्तावना प्रा. राजाभाऊ देशमुख यांनी विशद करून आदरांजली वाहण्यात आली संकल्प गीताने या कार्यक्रमाची सुरुवात झाली सुंदर सूत्रसंचालन सौ. सोनाली अभिजीत आखरे यांनी केले .याप्रसंगी कार्यक्रमचे अतिथी म्हणून प्रा. रूपलाल जी कावळे जिल्हासेवाधिकारी चंद्रपूर ज्येष्ठ प्रचारक चंदन लाल जी शर्मा वरोरा. माजी महापौर गुरुदेव उपासिका सौ.उज्वलाताई देशमुख चंद्रकांत जी शर्मा .राजेंद्र देशमुख .भीमरावजी गावंडे अड. श्रीदेवी ताई साबळे जिल्हा महिला प्रचारप्रमुख. आजीवन प्रचारक सुधाताई जवंजाळ. यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
Post Views: 265