अकोला - स्वच्छता पंधरवाडा निमित्त अकोला रेल्वे स्थानक येथे स्वच्छता अभियान पतंजलि टिळक पार्क रामदास पेठ योग परिवार तर्फे राबविण्यात आले. सर्वप्रथम स्टेशन प्रबंधक श्री. संतोष कवडे यांनी सर्व योग साधकांचे स्वागत केले. त्यानंतर रॅली काढण्यात आली. रॅलीमधे, स्वच्छ भारत, सुंदर भारत, स्वच्छ स्टेशन,सुंदर स्टेशन, स्वच्छ अकोला, सुंदर अकोला, अशा घोषणा देत रॅली प्लाटफार्म 1 व 2 वर काढणेत आली. सर्वांना स्वच्छतेचा संदेश देण्यात आला.
त्यानंतर संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला. स्वच्छतेचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचावा म्हणून एक सुंदर नाटीका टिळक पार्क योग परिवार तर्फे सादर करण्यात आली. सदर आयोजन पतंजलि योग परिवार तर्फे करण्यात आले होते. यामध्ये पतंजलि जिल्हा प्रमुख मा.डॉ सुहास काटे, यांचे मार्गदर्शनाखाली सुभाष शेकोकार, जी डी काकड तसेच डॉ सुनिता कावळे , ग्रुप अध्यक्षा मीनाताई गणगणे यांचे नेतृत्वाखाली सुंदर आयोजन करण्यात आले. याप्रसंगी भारत स्वाभिमान जिल्हा प्रमुख .श्री हरीशजी माखिजा, पतंजलि योग समिति सह जिला प्रमुख श्री हरीशजी पारवानी डॉ राजेश भोंडे उपस्थित होते. परिसर स्वच्छतेनंतर समारोप करण्यात आला. सदर स्वच्छता अभियान साठी स्टेशन प्रबंधक श्री. संतोष कवडे , मुख्य आरोग्य निरीक्षक ,श्री माळी ,व त्यांचा कर्मचारी वर्ग, आर पी एफ चे श्री अशोक चांदुरकर, व त्यांचा कर्मचारी वर्ग, श्रीकांत चाळीसगावकर, प्रदीप बांधवकर, सतीश फडणीस, गोपाल मावळे,किरण चौक, आशिष रावणकर, चंद्रशेखर फुलझेले, कुलभूषण बोंबले, मिनाताई गणगणे , सीमा फडणवीस, वैशाली मावळे, रेखा गणवीर,नलिनी ताई वानखेडे, निर्मला नागदेवे, रेणुका मेश्राम, आरती चव्हाण, वंदना राऊत, अनिता कोपेकर,माया एडलावार, कल्पना गायकवाड, कल्पना सोनोने, ममता जेरपोतवार, नंदा देशमुख, ज्योती गुप्ता,प्रणीती चव्हाण व ईतरही महीला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीकांत चाळीसगावकर प्रदीप बांधवकर, डॉ सुनिता कावळे सुभाष शेकोकार,जी डी काकड , यांनी परिश्रम घेतले.
Post Views: 61