मरावे परी अवयवरुपी उरावे प्रत्येकाने अवयवदानाचा संकल्प करावा - केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव


 विश्वप्रभात  10 Sep 2024, 9:51 PM
   

अकोला : मृत्युनंतर एका व्यक्तीने केलेले अवयवदान अनेकांसाठी आयुष्य देणारे ठरते. त्यामूळे प्रत्येकाने अवयवदानाचा संकल्प घेउन ‘मरावे परी अवयवरुपी उरावे’ हे ब्रीद  सार्थ अंगीकारावे, असे आवाहन केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार), आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधवयांनी आज येथे केले. कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आयोजीत अवयवदान जनजागृती महाअभियान सोहळ्यातबोलत होते. श्री.शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. आरोग्य उपसंचालक डॉ. कमलेश भंडारी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे, शा. वै. महाविद्यालय अधिष्ठाता डॉ. मीनाक्षीगजभिये, जिल्हा उपनिबंधक डॉ.प्रवीण लोखंडे,जि. स्त्री.रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. जयंतपाटील. अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती शिरीष धोत्रे, तुकाराम महाराज सखाराम पुरकरआदी उपस्थित होते.केंद्रीय राज्यमंत्री श्री.जाधव म्हणाले की, अकोला जिल्ह्यात 16 हजार नागरिकांनी केला आहे.  हा अवयदानाचा संकल्प एक विक्रम असून अकोला जिल्ह्याप्रमाणे देशभरातील नागरिकांनी अवयवदान करण्याचा संकल्प घेतल्यास गरजूंना त्याचा लाभ होईल. ही चळवळ जनमानसात रूजविण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.  अवयवदान महाअभियान सोहळ्याच्या प्रारंभी आरोग्य दिंडी काढण्यात आली.केंद्रीय राज्यमंत्री श्री. जाधव यांच्यासह विविध मान्यवर सहभागी झाले होते. समारंभात उपस्थितांकडून अवयवदानाची शपथ घेण्यात आली. नेत्रदान व अवयवदानाचा संकल्प घेतलेल्या व्यक्तींचा कृतज्ञता पत्र देऊन सन्मान करण्यात आला. कृषी उत्पन्न बाजार समिती, सार्वजनिक आरोग्य विभाग आणि लोकनेते वसंतराव धोत्रे स्मृती प्रतिष्ठान यांच्यातर्फे विविध संस्थांच्या सहकार्याने हा उपक्रम पार पडला.  या कार्यक्रमानंतर केंद्रीय राज्यमंत्र्यांनी वैद्यकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांशी चर्चा करून वैद्यकीय साधन सुविधा व विविध प्रस्तावांसंदर्भात माहिती घेतली. 

    Post Views:  70


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व