लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या अकोला जिल्हा कार्यकारिणीत के.व्ही.देशमुख मार्गदर्शक पदाधिकारी...!
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
19 May 2023, 5:31 PM
अकोला - लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेच्या अकोला जिल्हा कार्यकारिणीत शैक्षणिक क्षेत्रातून मार्गदर्शक पदाधिकारी म्हणून सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री.के.व्ही.देशमुख डोंगरगावकर यांना सन्मानपूर्वक नियुक्त करण्यात आले आहे.संस्थापक - राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख यांचे मार्गदर्शनात जिल्हाध्यक्ष मोहन शेळके यांनीही नियुक्ती केली आहे.
लोकस्वातंत्र पत्रकार महासंघ सामाजिकता आण पत्रकार कल्याण अशा संकल्पनेने काम करणारी संघटना आहे.त्यामुळे संघटना वाढीच्या दृष्टीने आणि सामाजिक उपक्रम आणि प्रश्नांना चालन देण्यासाठी या संघटनेच्या जिल्हा आणि वरील सर्व कार्यकारिणीमध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांना मार्गदर्शक पदाधिकारी म्हणून सन्मानपूर्वक निमंत्रित केल्या जाते.श्री.के.व्ही. देशमुख हे शैक्षणिक,सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रातील एक सुपरिचित सक्रिय व्यक्तिमत्व आहे.त्यामुळे या संघटन रचनेप्रमाणेच शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रामधून त्यांना अकोला जिल्हा कार्यकारिणीत मार्गदर्शक पदाधिकारी म्हणून सहभागी करण्यात आले आहे.त्यांच्या या नियुक्तीचे लोकस्वातंत्र्य पदाधिकारी,सभासद व स्नेहीजण यांनी अभिनंदन करून स्वागत केले आहे.
Post Views: 277