नववर्षाची सुरुवात नन्नाच्या पाढ्याने, नाशिक मार्गावरच्या 18 गाड्या आजपासून रद्द; प्रवाशांचे बेहाल


 संजय देशमुख  01 Jan 2022, 10:45 AM
   

नाशिकः नाशिक मार्गावरच्या 18 रेल्वे आजपासून रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे येत्या 9 जानेवारीपर्यंत नागरिक आणि चाकरमान्यांचे प्रचंड हाल होणार आहेत. कारण एकीकडे एसटी बंद आहेत. दुसरीकडे महत्त्वाच्या रेल्वे बंद झाल्याने प्रवास करायचा तरी करा, असा सवाल निर्माण होत आहे. मुंबईत कळवा-दिवा दरम्यान रेल्वेचा मेगाब्लॉक आहे. त्यामुळे तपोवन, पंचवटी, नंदीग्राम, जनशताब्दी या गाड्यांसह मनमाड-नाशिक मार्गावरच्या गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. या मेगाब्लॉकमुळे ऐन नव्या वर्षाची सुरुवात अशी नन्नाच्या पाढ्याने झाली आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड संताप आहे.

या गाड्या रद्द…

– नांदेड-मुंबई-नांदेड तपोवन एक्स्प्रेस 1 व 2 जानेवारी रोजी धावणार नाही.
– जालना-मुंबई-जालना अप-डाऊन जनशताब्दी एक्स्प्रेस ही गाडी 2 जानेवारी रोजी धावणार नाही.
– मनमाड-मुंबई-मनमाड पंचवटी एक्स्प्रेस ही गाडी 2 जानेवारी रोजी धावणार नाही.
– मुंबई-अदिलाबाद-मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस ही गाडी 2 व 3 जानेवारी रोजी धावणार नाही.
– नागपूर-मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस ही गाडी 1 व 2 जानेवारी रोजी धावणार नाही.
– मुंबई-जालना जनशताब्दी अप-डाऊन ही गाडी 8 व 9 जानेवारी रोजी धावणार नाही.
– मनमाड-मुंबई-मनमाड पंचवटी अप-डाऊन ही गाडी 8 व 9 जानेवारी रोजी धावणार नाही.
– मुंबई-अदिलाबाद-मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस ही गाडी 8 व 9 जानेवारी रोजी धावणार नाही.
– नागपूर-मुंबई-नागपूर-सेवाग्राम एक्स्प्रेस अप-डाऊन ही गाडी अनुक्रमे 7, 8, 9, 10 जानेवारी रोजी धावणार नाही.
– मुंबई-नांदेड-मुंबई एक्प्रेस ही गाडी 8, 9, 10 जानेवारी रोजी धावणार नाही.
– नांदेड-मुंबई-नांदेड तपोवन एक्स्प्रेस ही गाडी 7, 8, 9 जानेवारी रोजी धावणार नाही.

लोकल कधी सुरू होणार?

नाशिक-कल्याण मेमू लोकल लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. नाशिक-कल्याण मेमू (मेन इलेक्ट्रिकल मल्टिपर्पझ युनिट) लोकलसेवेला यापूर्वीच मान्यता मिळाली आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या नावाखाली ही मागणी बासनात गुंडाळण्यात आली. त्यानंतर ही निवडणूक झाल्यानंतर नव्या वंदे मातरम् मेमू लोकलची चर्चा सुरू झाली. यात दिवसांमागून दिवस सरत गेले. मात्र, नाशिकसाठी अतिशय महत्त्वाची असणारी मेमू लोकल काही सुरू झाली नाही. पुन्हा कालांतराने मेमू लोकलच सुरू होईल, अशी घोषणा रेल्वेने केली. या लोकलचा चाकरमान्यांपासून ते थेट विद्यार्थ्यापर्यंत साऱ्यांनाचा मोठा फायदा होणार आहे. आता महापालिका निवडणुकीपूर्वी तरी ही लोकल सुरू होते का, याची साऱ्यांना उत्सुकता आहे.

    Post Views:  174


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख