लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ च्या परभणी जिल्हा कार्याध्यक्ष पदी प्रमोद अशोकराव अंभोरे यांनी निवड
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
28 Oct 2024, 8:39 AM
परभणी-संपूर्ण भारत भर पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढा देणारी संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री संजयजी देशमुख साहेब यांच्या नेतृत्वाखाली चालणारी सर्व समावेशक पत्रकार संघटना लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेत युवा पत्रकार प्रमोद अशोकराव अंभोरे यांची परभणी जिल्हा कार्याध्यक्षपदी मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली आहे.
परभणी शहरातील निर्भीड युवा पत्रकार समाजहित न्यूज चॅनेल चे संस्थापक संपादक प्रमोद अशोकराव अंभोरे यांनी सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता क्षेत्रात केलेल्या निर्भीड, निःस्वार्थ कार्याचा आढावा घेऊन पदोन्नती करत लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष मा. संजयजी देशमुख साहेब यांचे मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र संघटन प्रमुख मा. भगीरथ बद्दर व परभणी जिल्हा अध्यक्ष मा. दिलीपजी बनकर यांच्या स्वाक्षरी ने प्रमोद अशोकराव अंभोरे नियुक्तीपत्र देऊन लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या परभणी जिल्हा कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
या निवडीचे पत्र दिनांक २६ ऑक्टोबर २०२४ रोजी परभणी शहरातील नूतन महिला महाविद्यालय येथील एका कार्यक्रमात इंजि. आर. डी. मगर, सत्तार इनामदार, ऍड. अशोकजी सोनी, जे. डी. शाह, खदिर लाला हाश्मी, हाजी शरीफ शेख, सूरज कदम, अॕड. निलेश पुरी, रफिक शेख, सरफराज शेख, तब्बू पटेल, दिलीप बनकर, मदन बापू कोल्हे, देवानंद वाकळे आदींच्या हस्ते हे नियुक्ती पत्र त्यांना देण्यात आले. यावेळी भगीरथ बद्दर, दिलीप बनकर, शेख सरफराज, शेख कलीम, संदीप वायवळ, प्रशांत वाटूरे, उषा पंचांगे, रेखा पाईकराव, रेखा गायकवाड, युनूस बोगाणी कच्ची, फारूक भाई,बाबा लाड, शेख मेहेबूब व आदींची उपस्थिती होती.
प्रमोद अशोकराव अंभोरे यांची लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या परभणी जिल्हा कार्याध्यक्ष पदी पदोन्नती झाल्या बद्दल त्यांच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Post Views: 12