तारापूरच्या वेलियट ग्लास कारखान्यात कामगाराचा संशयित मृत्यू
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
07 Aug 2024, 9:53 AM
(संतोष घरत) - जिल्हा प्रतिनिधी
बोईसर! तारापूर औद्योगिक क्षेत्रात दिवसेंदिवस अनेक घटना घडून नाहक कामगाराला आपला जीव गमवावा लागत आहे. ह्या मुळे पुन्हा एकदा कामगाराच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
आज मंगळवार ६ ऑगस्ट रोजी सकाळी १०ते ११ च्या दरम्यान तारापूर औद्योगिक क्षेत्रातील वेलियंट ग्लास वर्क प्रायव्हेट लिमिटेड भूखंड क्रमांक जे - ८५ ह्या कारखान्यामध्ये हेल्पर म्हणून काम करत असलेला कामगार गुलाब जैस्वाल वय ३२ वर्ष याचा टाकीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
प्रथमता या कामगाराला बोईसर मधील सिटी जनरल हॉस्पिटल या ठिकाणी फार्मूलीटीज म्हणून दाखविण्यात आले. नंतर त्याला सरकारी हॉस्पिटल टिमा येथे दाखल करण्यात आले. सदर व्यक्ती हा कारखान्यामध्येच मृत्यू पावला असल्याने त्याला इतरत्र हॉस्पिटलमध्ये फिरवणे म्हणजे एक प्रकारे खेळच होता.
टीमा हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर कामगाराच्या बरोबरीने काम करणारे कामगार त्या ठिकाणी उपस्थित होते. ठेकेदार आणि मृत्य व्यक्ती गुलाब जैस्वाल यांच्यामध्ये काही कारणास्तव वाद निर्माण होऊन त्यांच्यात झालेल्या झटापटीत कामगार हा केमिकल युक्त गरम पाण्याच्या टाकीमध्ये पडून मृत्यू झाल्याची चर्चा ऐकायला मिळाली. ठेकेदार सिंग व कारखाना व्यवस्थापन ह्यांचा हलगर्जीपणामुळे निष्पाप कामगार गुलाब जयस्वाल ह्याचा मृत्यू झाला. घडलेली हकीकत जेव्हा कामगारांना विचारत होतो. तेव्हा नाममात्र ठेकेदार समजणारा अतुल सिंग ह्याने जनतेच्या समोरच त्यांच्यावर धक्काबुक्की करून त्याच्यावर दबाव आणत असल्याचे दिसले. म्हणजेच जी चर्चा सुरू होती त्यामध्ये तथ्य आहे असे यावरून दिसते.
वेलियंट ग्लास वर्क प्रायव्हेट लिमिटेड कारखान्यात काम करणाऱ्या कामगाराबाबत कोणतीही सुरक्षा यंत्रणा सदर कारखाने राबवलेली दिसत नाही.
Post Views: 203