*जिल्हा परिषद शाळा खैरखेड येथे प्रजासत्ताक दिन साजरा*
सांस्कृतिक कार्यक्रमाचे केले आयोजन*
अकोट: जिल्हा परिषद शाळा खैरखेड येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात प्रभात फेरीने झाली .यानंतर राष्टपिता महात्मा गांधी व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमा पूजन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी सरपंच सौ.अनुराधाताई मेतकर व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.श्रीकृष्ण डोंगरे उपस्थित होते. ध्वजारोहण शाळेचे मुख्याध्यापक श्री. रघुनाथ माळवे सर यांनी तर सूत्रसंचालन श्री विजय हरणे सर यांनी केले. यावेळी अध्यक्ष तथा सर्व पाहुण्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत गायन केले तसेच विद्यार्थिनींनी आपल्या भाषणातून प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व सांगितले. नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय शालेय खेळ व क्रीडा स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना ग्रामपंचायत खैरखेड च्या वतीने भेटवस्तू देण्यात आली .
यानंतर चिमुकल्यांचे बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन पंचायत समिती सदस्या सौ.राधाताई प्रल्हादराव काळे व ग्रामपंचायत सरपंचा सौ. अनुराधाताई मेतकर यांचे हस्ते करण्यात आले. या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी संस्कृतिक, सामाजिक, राजकीय तसेच ग्रामीण भागातील अनेक गमतीदार कलाविष्कार सादर केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री शशिकांत भड सर यांनी तर आभार प्रदर्शन सागर तळोकार यांनी केल्याची माहिती वरीष्ठ शिक्षक श्री.संदीप कुलट सर यांनी शाळेच्यावतीने दिली.
Post Views: 178