प्रभातच्या चार ज्युदोपटूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  04 Jan 2023, 12:33 PM
   

अकोला : प्रभात किड्स स्कूलच्या चार ज्युदोपटूंनी विभागस्तरीय शालेय ज्युदो स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला असून त्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
    क्रीडा व युवासेवा संचालनालय, पुणे अतंर्गत अमरावती क्रीडा कार्यालयाद्वारे विभाग स्तरीय स्पर्धेचे आयोजन श्री. शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय,अमरावती येथे दि. २८ आणि २९ डिसेंबर दरम्यान करण्यात आले होते.
  या स्पर्धेत प्रभातच्या १४ वर्षाखालील गटात सृष्टि काळे हीने प्रथम क्रमांक पटकविला तर १७ वर्षाखालील विविध वजन गटात तेजल दिघे, संचिता राठोड आणि राजनंदिनी बुंदेले यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. या चारही ज्युदोपटुंची निवड राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे. विजयी खेळाडूंना प्रभातच्या ज्युदो प्रशिक्षक किरण बुंदेले यांचे मार्गदर्शन प्राप्त झाले.
   प्रभातच्या प्राचार्य वृषाली वाघमारे, उपप्राचार्य अर्चना बेलसरे, क्रीडा विभाग प्रमुख संतोष लोमटे यांच्यासह प्रभातच्या शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी विजयी विद्यार्थ्यांचे कौतुक केले असून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

    Post Views:  221


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व

संपादकिय

सर्व

Failed to connect to MySQL: Operation not permitted