विभागीय कुस्ती स्पर्धेत सुमित नागे व गौतम शिरसाट विजयी


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  15 Dec 2022, 8:51 AM
   

विभागीय कुस्ती (फ्रिस्टाईल/ग्रीको रोमन) क्रीडा स्पर्धा 2022-23 अमरावती, येथिल स्पर्धेत न्यू इंग्लिश कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी सुमित नागे व गौतम शिरसाट आज विजयी झाले त्यांची राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धे करीता निवड झाली दोन्ही विद्यार्थी अतिशय चिकाटीने खेळले पहिला सामना बुलढाणा दुसरा अकोला आणि तिसरा अंतिम सामना अमरावती जिल्ह्यातील खेळाडूशी झाला अतिशय चुरशीचा सामना झाला आपल्या खेळाडूंच्या आत्मविश्वासाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे दोन्ही खेळाडूंनी मोठ्या मेहनतीने यश मिळवीले जनू काही वाघ्याच्या जाळ्यातून विजयी होणे याला खुप मोठेशोर्य लागते अकोला एज्युकेशन सोसायटीच्या पदाधिकारी अध्यक्ष श्री भाऊ साहेब मांडवगणे सर सचिव अमरावतीकर सर ,मा.देशपांडे व इतर सर्व पदाधिकारी यांनी कौतुक केले तसेच शाळेचे प्राचार्य श्री माधव मुनशी सर उपमुख्याध्यापक श्री रेलकर सर प्रभारी पर्यवेक्षक श्री अमोल बुटे सर श्री थुटे सर विजयी खेळाडूंना सतत प्रोत्साहित करत होते शाळेतील सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही विजयी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व पुढिल वाटचाली राज्यस्तरीय स्पर्धे करीता शा.शि.हातवळणे सर पांडे सरयांनी अथक परिश्रम घेतले आणि पुढिल वाटचाली करीता शुभेच्छा दिल्या

    Post Views:  173


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व