निसर्गकवी शिवराजे जामोदे कविराज यांचा 1001 कवितांचा विक्रम
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
26 Oct 2022, 9:51 AM
आकोला( प्रतिनिधी )
मराठी जगताचे निसर्गकवी शिवराजे जामोदे कविराज यांनी मराठी भाषेमध्ये सलग 1001 कविता लिहून साहित्य क्षेत्रा
मध्ये आगळा वेगळा विक्रम प्रस्थापित केला. जगामध्ये कोरोनाची लाट आल्यानंतर त्यावर विजय मिळवत, वेळेचा सदुपयोग घेत प्रत्येक दिवसी त्यांनी एक कविता लिहिली. आश्विन महिन्यात धनतेरसच्या शुभमुहूर्तावर त्यांनी 1001 कविता लिहून पुर्ण केल्या आणि गौरवशाली इतिहास घडविला. साहित्य क्षेत्रातील चार दशकांची फलश्रृती म्हणजे म्हणजे त्यांचा विक्रम! कविराज या नावाने विख्यात असलेले शिवराजे जामोदे हे आडसूल ता. तेल्हारा जी. आकोला येथे मातोश्री मैनाबाई ढोणे विद्यालयामध्ये मराठीचे शिक्षक आहेत. राजभाषा मराठीच्या सवंर्धना करिता मराठी साहित्य संमेलने,कविसंमेलने, शेकडो काव्य मैफिलींचे आणि शेकडो उपक्रमांचे वेळोवेळी आयोजने केलेली आहेत.
दिवसा माजी काहितरी लिहावे
प्रसंगी अखंडित वाचत जावे
या संत रामदास स्वामीं यांनी लिहिलेल्या काव्यओळी त्यांनी स्वताच्या नियमित लिखाणातून खऱ्या करून दाखविल्या आहेत. काव्य लिखानाबरोबरच त्यांनी मराठी भाषेमध्ये 3000 सुविचांचे लिखाण करून आदर्श निर्माण केला आहे.
अखंड वाचन, मनन, चिंतन यांची फलश्रृती म्हणजे त्यांच्या नाबाद 1001 कविता. कवितांचे राजे, शिवराजे असे गौरवोद्गार त्यांच्या बद्दल मराठी साहित्य विश्वात काढले जात आहेत. गेल्या चाळीस वर्षा पासून ते साहित्य लिखाण करित आहेत. ते स्वता उत्कृष्ट वक्ते, निसर्ग लेखक, आदर्श शिक्षक, गोड गळ्याचे गायक, तथा शिवप्रेमी, सृष्टी प्रेमी आहेत. सलग 1001 मराठी कविता लिहून विक्रमवीर ठरलेले शिवराजे जामोदे सरांनी कवितांचे लखलखते हजारो दिप प्रज्वलित करून अक्षरांची दिवाळी साजरी केली आहे. लवकरच त्यांचा झाडांच्या रानात, फुलांच्या बनात या नावाचा दर्जेदार निसर्ग कवितांचा काव्यसंग्रह येतो आहे. त्यांच्या रूपाने आज महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांची मान उंच झाली आहे .
Post Views: 220