कारुण्याचं महाकाव्य गाथा रमाईची हा ग्रंथ अनमोल ठेवा


ग्रंथ समिक्षणपर बोलतांना विचारवंत अ‍ॅड. प्रजानंद उपर्वट
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  05 Mar 2026, 8:37 AM
   

अकोला :  गोवर्‍या वेचून  संसाराचा गाडा चालवून पतीच्या उच्च शिक्षणात अडथळा न आणता त्यांना महामानवपदी विराजमान करण्यात सिंहाचा वाटा असणार्‍या तसेच पतीला सावलीप्रमाणे साथ देणार्‍या महामाता रमाई कारुण्याचं जागतीक महाकाव्याचा अनमोल ठेवा ग्रंथ असल्याचं प्रतिपादन गाथा रमाईची ग्रंथावर समिक्षणपर बोलतांना सुप्रसिद्ध वकील तथा आंबेडकरी विचारवंत अ‍ॅड. प्रजानंद उपर्वट यांनी बोलतांना व्यक्त केले.  कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ.जया भारती होत्या तर प्रमुख उपस्थितीमध्ये लोकस्वातंत्र्यचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख, प्रा.डॉ.संतोषभाऊ हुशे, नारायणराव अंधारे, पत्रकार निशाली पंचगाम, यांची विचारमंचावर प्रमुख उपस्थिती होती.  ते पुढे म्हणाले की,  मित्रांनो, भीमराव समस्त समाजाचे बाबासाहेब  तर रमाई कोट्यावधी लेकराची माय झाली आहे. रमाईचे चार लेकरं औषधपाण्याअभावी मरण पावली, पोटच्या गोळ्याला फाटक्या लुगड्याच्या फडक्यात गुंडाळून अंत्यसंस्कार करावा लागला हे दुख काळीज पिळवटून टाकणारं आहे संपुर्ण कुटूंबाचा गाडा चालविला. रमाईने संपुर्ण आयुष्याचा त्याग केला असल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर महामानवपदी विरोजमान होऊ शकले.  ह्या त्यागमूर्ति रमाई वरील पंजाबराव वर लिखीत ‘गाथा रमाईची‘ हा ऐतिहासिक व महत्वपूर्ण ग्रंथ असल्याने तो ग्रंथ संग्रही ठेऊन मायमाऊलीने तसेच शाळकरी आणि महाविद्यालयीन तरुणींनी हा ग्रंथ अवश्य वाचावा आणि मनामध्ये साठवून आदर्श इतरांसमोर ठेवाल्यास तुमच्या जिवनाचे सोने झाल्या शिवाय राहणार नाही असेही ते म्हणाले.  यावेळी ज्येष्ठ पत्रकार गजानन सोमाणी यांना ‘लोकस्वातंत्र्य पत्रकार भुषण सेवागौरव' तर अनिल मावळे, बुढन गाडेकर, कैलास टकोरे, दिपक शिरसाट, संघपाल शिरसाट यांना प्रभावी पत्रकारिता गौरव पुरस्कारांनी आणि गजानन थोरात व दिलीप नवले यांना सामाजिक सेवा गौरव पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. ़कार्यक्रमाचे संचालन प्रा. देवाबाबू लुले तर आभार प्रदर्शन ़कादंबरीकार पुष्पराजदादा गावंडे यांनी मानले.

    Post Views:  23


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व