राष्ट्रवादीच्या माजी शहराध्यक्षाच्या मुलाचा अवैध बायोडिझेल साठा जप्त
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; येवता रोडवरील शेतात सुरू होती विक्री
अकोला : जिल्ह्यातील बायोडिझेल विक्री केंद्र बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यानंतरही अवैध मार्गाने बायोडिझेल विक्री करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष अजय तापडीया यांच्या मुलाच्या येवता रोडवरील शेतात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत बायोडिझल वाहने व साहित्यासह एकूण एक कोटी 26 लाख 45 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मलकापूर शिवारातील मलकापूर-येवता रोड लगत असलेल्या शेत सर्वे नं ७४ येथे प्रसन्न अजय तापडीया यांचे अवैध बायोडिझेल साठा असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे अजय तापडीया यांचे शेतात छापा टाकला असता त्याठिकाणी एका 24 लाखाचे १४ चाकी मोठे टॅकर क्रमांक एमएच ४६ बीएम २३३१ मध्ये ३० हजार लिटर बायोडिझल आढळून आले. याशिवाय 16 लाखाचे टॅंकर क्रमांक एमएच ३० एल २०८७ मध्ये २० हजार लिटर बायोडिझल आढले. तिसऱ्या टॅंकर 3 लाख 20 हजाराचे एमएच ३० एल १७५१ मध्ये चार हजार लिटर बायोडिझल आढळले. सोबतच डिझेल मोजण्याचे माप, बयोडिझल काढण्याकरिता असलेले तीन लाख रुपयांचे यंत्र, दोन इलेक्ट्रीक मोटर व इतर साहित्य आढळून आले. बायोडिझल वाहने व साहित्यासह एकूण एक कोटी २६ लाख ४५ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक मोनिका राऊत यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संतोष महल्ले, स.पो.नि नितीन चव्हाण, ए. एस.आय. ठाकूर, पांडे, संतोष गवई, मोन्टी यादव, शक्ती कांबळे, विरेंद्र लाड, उदय शुक्ला, पवन यादव, नफीज शेख, विजय कबले, सायबर सेलचे गणेश सोनवणे, गीता अवचार, सतिश गुप्ता, सुशिल खंडारे यांनी केली.
या आरोपीला केली अटक
या कारवाईत रोहन नंदु बिटनी (२०) रा. येवता रोड व्दारा लॉन मलकापूर, शेख समीर शेख हसन (२२) रा. राहुल नगर शिवणी, जावेद हुसेन सफदर हुसेन (४२) रा.पोळा चौक जुने शहर, जयहिंद ज्ञानोबा सानप (४0) रा. दैठना ता. परळी जि. बिड ह.मु. एसआयजी एक रूम नं ए २४ कळंबोली सेक्टर नं २ कंळबोली नोड रायगड यांना अटक करण्यात आली.
माजी शहराध्यक्षकांचा मुलगा, राठी फरार
बायोडिझेलचा अवैध साठा करून त्याची विक्री करणारे मुख्य आरोपी प्रसन्न अजय तापडीया व अभय अनुप राठी हे फरार असून, त्यांचा शोध पोलिस घेत आहे. या गुन्ह्यांचे आणखी आरोपीचा सहभाग असल्याचे शक्यता असल्यामुळे अवैधरीत्या शासनाने प्रतिबंधित केलेले बायोडिझल, रीनेबलडिझल विक्रीचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.
Post Views: 290