जीपीए अकोलातर्फे डॉ . सॅम्युअल हॅनेमन जयंती सोत्साहात साजरी !
अकोला-- जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन अकोलाच्या वतीने होमिओपॅथीचे जनक डॉ. सॅम्युअल हॅनेमन यांची जयंती १० एप्रिलला डॉ . चारुशीला काळे मेमोरियल जीपीए हॉल , आदर्श कॉलनी येथे उत्साहात संपन्न झाली . हा जयंती सोहळा जीपीए चे अध्यक्ष डॉ . सतीश उटांगळे यांचे अध्यक्षतेखाली तसेच जीपीएचे मार्गदर्शक मा .डॉ . अनूप कोठारी , मा.डॉ.किशोर मालोकार , मा. डॉ . चंद्रकांत पनपालिया यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला . ह्यावेळी मान्यवरांच्या शुभहस्ते
डॉ . सॅम्युअल हॅनेमन यांच्या प्रतिमेचे आणि अर्धाकृती पुतळ्याचे पूजन करण्यात आले . ह्यावेळी जीपीएचे सदस्य डॉ . अरुण पंड्या यांनी डॉ. सॅम्युअल हॅनेमन यांच्या जीवनचरित्रावर व्याख्यान दिले . तसेच प्रमुख अतिथीनी ह्यावेळी प्रासंगिक मार्गदर्शन केले . कार्यक्रमाचे संचालन जीपीए सचिव डॉ . विनय दांदळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार जीपीए कोषाध्यक्ष डॉ. आदित्य नानोटी यांनी केले . ह्या जयंती सोहळ्याकरिता जीपीएचे सन्माननीय सदस्य डॉ . सतीश उटांगळे , डॉ. अनूप कोठारी , डॉ. किशोर मालोकर , डॉ. चंद्रकांत पनपालिया , डॉ विनय दांदळे , डॉ . आदित्य नानोटी , डॉ . संजय पाटील ,
डॉ . प्रद्युम्न शाह , डॉ . अरुण पंड्या , डॉ.राजेंद्र नेमाने , डॉ. सुनील बिहाडे , डॉ. राजू देशपांडे , डॉ . तिलकराज सरनायक , डॉ. आशिष पनपालिया , डॉ . महेश कुलकर्णी , डॉ.नरेंश गोंड , डॉ . नरेंद्र श्रीवास , डॉ. रोठे , डॉ .प्रवीण अग्रवाल , डॉ. तुळसकर , डॉ. कदम , डॉ. संदीप चव्हाण , डॉ. अनिल जैन , डॉ.राजेश काटे , डॉ . अनिरुद्ध कुलकर्णी , डॉ. प्रशांत सांगळे , डॉ . राजेंद्र अग्रवाल , डॉ. सुनील फोकमारे , डॉ. संजय तिवारी , डॉ ..हर्षद सायानी , डॉ ..अशोक ओळंबे यांचे सह बहुसंख्य जीपीए सदस्य उपस्थित होते .
Post Views: 285