निर्माण ग्रूपच्या प्रजासत्ताक दिन समारोहात लोकस्वातंत्र्य व देशमुख मंडळाकडून गणेशराव देशमुख यांचं सत्कार
बॅंकॉकच्या इंटरनॅशनल गोल्डन पिनाकल अवार्ड या बहूमानाबध्दल अभिनंदन
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
27 Jan 2024, 8:19 AM
अकोला - निर्माण ग्रूपच्या बोरगांव मंजू येथील निर्माण फल्टीलायझर प्लॉन्टवर ७५ वा भारतीय प्रजासत्ताक दिन व ७४ वा वर्धापनदिन दिन समारोहाचे आयोजन करण्यात आले होते.संस्थापक - अध्यक्ष श्री गणेशराव देशमुख यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात निर्माण मल्टीस्टेट को.ऑप.क्रेडीट सोसायटीचे सरव्यवस्थापक श्री जे.पी.खोटरे व निर्माण फल्टीलायझर चे सरव्यवस्थापक श्री अभिजीत देशमुख व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थिती होते. या संस्थेत दरवर्षी अध्यक्षच नव्हे तर ईश्वरचिठ्ठी काढून वेगवेगळ्या अधिकारी,कर्मचाऱ्यांना झेंडा वंदन करण्याचा सन्मान दिला जातो.असा आदर्श पायंडा निर्माण ग्रूपने कायम केला आहे.
याप्रसंगी श्री गणेशराव देशमुख यांना बॅंकॉक येथे इंडो - थायलंड फ्रेन्डशीप न्ड इकॉनॉमिक को-ऑपरेशन परिषदेमध्ये "इंटरनॅशनल गोल्डन पिनाकल अवार्ड मिळाला.या आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्राप्त बहूमानाबध्दल लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेकडून व अकोला जिल्हा देशमुख समाजसेवा मंडळ,देशमुख समाज जागृती मंडळाच्या वतीने सत्कार करून त्यांना अभिनंदनासह शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.अकोला जिल्हा देशमुख समाजसेवा मंडळाचे उपाध्यक्ष, श्री.के.व्ही.देशमुख,व मंडळ अध्यक्ष तथा लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष श्री.संजय एम.देशमुख(निंबेकर),वसंतराव देशमुख,नारखेडकर,सचिव अश्विन देशमुख,देशमुख जागृती मंडळ अध्यक्ष श्री.संजय कृ.देशमुख,(कंझारेकर) यांनी गणेशराव देशमुख यांनी गणेशराव देशमुख यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या.या कार्यक्रमाला निर्माण जठारपेठ शाखाध्यक्ष श्री.विठ्ठलराव देशमुख,श्री संतोषराव देशमुख व निर्माणचे संचालक व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views: 154