पायदळ वारी निमित्त दिव्यांग सोशल फाउंडेशन चा भक्तीधारा कार्यक्रम संपन्न
Sanjay Deshmukh
2023-01-17
अकोला :स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला चे संस्थापक अध्यक्ष व शिवाजी महाविद्यालय अकोला चे सहाय्यक प्रा.विशाल कोरडे यांच्या मार्गदर्शनात दिव्यांगांसाठी विविध सामाजिक उपक्रम संपूर्ण भारतभर राबवले जात आहेत .श्री गजानन महाराज सेवा समिती ,न्यू तापडिया नगर ,अकोला तर्फे पायदळ वारी निमित्त दिव्यांग कलावंतांचा भक्तीधारा हा कार्यक्रम 14 जानेवारी २०२२ रोजी संपन्न झाला . भक्ती संगीत व सामाजिक उपक्रम यांचा मेळ असणाऱ्या या कार्यक्रमात प्रा.विशाल कोरडे यांचे ब्रेल जयंती निमित्त ब्रेल पुस्तकांचे महत्त्व व जनजागृती या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते .
या भक्ती संगीताच्या मैफिलीत प्रा.विशाल कोरडे ,प्रा.अरविंद देव ,नागेश उपरवट ,अनामिका देशपांडे ,स्वाती मेश्राम ,रश्मी पाटील व लीना बर्गी यांनी सहभाग नोंदवला . विविध भक्ती गीते व अभंग गाऊन कलावंतांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले आयोजन समितीतर्फे दिव्यांग कलावंतांचा सत्कार व दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या सामाजिक कार्यासाठी आर्थिक सहकार्य केले गेले .जानेवारी ते मार्च दरम्यान दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या संगीत चम्मू तर्फे अकोल्याच्या विविध प्रभागात भक्ती संगीताचे कार्यक्रम व दिव्यांग जनजागृती केली जाणार असून आपल्या प्रभागात हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी संस्थेच्या ०९४२३६५००९० या हेल्पलाइनवर संपर्क साधावा असे आव्हान प्रा.अरविंद देव यांनी केले . भक्तीधारा कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. गजानन मालठानकर,प्रविण भिवगडे,आशिष अरसड,प्रशांत अरसड,पंकज नेमाडे, रामसजन चौहान,अनंता चोपडे, सौ. छाया मालठानकर,सौ. माया शेळके
सौ. किर्ती नेमाडे,सौ. कांता मेतकर,डाॅ. जयश्री जोशी,विजय कोरडे व संजय फोकमारे यांनी सहकार्य केले .
Post Views: 148