श्री कर्ता हनुमान मंडळाची महिनाभर काकडा आरती उत्साहात संपन्न
कार्तिक पौर्णिमेनिमित्त भव्य दिंडी व धार्मिक कार्यक्रमाने सांगता
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
25 Nov 2026, 10:04 AM
अकोला : श्री कर्ता हनुमान मंडळ, वानखडे नगर, डाबकी रोड, अकोला यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही कार्तिक महिन्यानिमित्त महिनाभर काकडा आरतीचे आयोजन करण्यात आले होते. कोजागिरी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसापासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत म्हणजेच दिनांक २६ ऑक्टोबर ते २४ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत हा धार्मिक उपक्रम मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडला.
या संपूर्ण महिनाभर पहाटेच्या वेळी काकडा आरती, दीपप्रज्वलन, भजन, हरिपाठ व आकर्षक रांगोळ्यांच्या माध्यमातून भारतीय संस्कृती आणि धार्मिक परंपरेचे जतन करण्यात आले. श्री कर्ता हनुमान मंदिर, गोरोबा काका मंदिर, गुरुदेव नगर येथील गजानन महाराज मंदिर, बजरंगबली मंदिर, दत्त चौक, संभाजी चौक व रुद्र मंदिर अशा विविध ठिकाणी काकडा आरतीचे आयोजन करण्यात आले होते.
या संपूर्ण धार्मिक उपक्रमाचे नियोजन श्री कर्ता हनुमान मंडळाचे अध्यक्ष तथा माजी सैनिक श्री. सुभाषराव पाटील म्हैसने यांनी केले.
काकडा आरतीसाठी सेवा देणारे मान्यवर
या धार्मिक उपक्रमात ह.भ.प. सुखदेवराव वाडकर महाराज – विणेकरी, ह.भ.प. गजानन माळी – मृदंगाचार्य, गायक ह.भ.प. प्रकाश कुलट, ह.भ.प. वैभव वसू महाराज, ह.भ.प. पंजाबराव वाघ महाराज, दत्ता वेध, भास्करराव चेडाळणे, सेलसिंग सिसोदिया, ज्ञानेश्वर मानकर, प्रदीप घोडसकर, भिकाभाऊ भगत, पुजारी सेवाधारी दिनकर गढे, मुरलीधर अंधारे, माजी सैनिक लक्ष्मण मोरे, संजय बहाळ आदींनी विविध प्रकारच्या धार्मिक सेवा दिल्या.
उपस्थित मान्यवर व भाविक
या धार्मिक उपक्रमात श्री. गजानन धरमकर, चंद्रकांत ताठे, विठ्ठलराव चिकटे, मुरलीधर आवटे, दीपकजी चतार, अशोक भिलकर, अनिलभाऊ गावंडे, राजेश टेकाडे, प्रल्हाद शेळके, वसंतराव जायदे, डॉ. प्रमोद हेलगे, भागवत गिरी, रमेशराव शेरेकर, विलास आगरकर, भगवान पटोकार, विनोदभाऊ दांदळे, आनंदराव चिचोळकर, भिकुलालजी पोपट, अर्जुनराव राऊत, अरुण साबळे, महादेवराव खरसाळे, हिंमतराव पोहरे, शरदभाऊ लोटे, शरदभाऊ कोकाटे, शिवाजी सांगुनवेडे, नरेंद्र भोयर, निखिल नहाटे, दिवाकरराव देशमुख, देवलालजी उजाडे, गजानन माळी (मंडपवाले), मुरलीधर झटाले, विलासभाऊ वानखडे, अतुल होनाळे, शामभाऊ मते, अनुराग आठवले, ईश्वर गिरिपुंजे, किशोर तिखीले, विजय काळे, दिलीप देशपांडे, राजेंद्रजी मालाणी, ओमप्रकाश चांडक, संतोषभाऊ जाधव, भीमरावजी ठाकरे, प्रभाकर ठाकरे, उमेशभाऊ आदींसह मंडळाचे पदाधिकारी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच कु. विधी विनोद दांदळे, वैभवी संजय चिकटे, प्रांजल वानखडे, भाग्यश्री मेटेकर व कु. बासोले यांनीही या धार्मिक उपक्रमात सहभाग नोंदविला.
राजकीय व सामाजिक मान्यवरांची उपस्थिती
या काकडा आरतीला माजी आमदार अमोलदादा मिटकरी, शिवसेना (शिंदे गट) पदाधिकारी तथा जिल्हा अध्यक्षा व विद्यमान नगरसेविका सौ. उषाताई विरक, मा. अशोक पाटील ओळंबे, महानगर अध्यक्षा सौ. वर्षाताई राऊत, अर्चनाताई राऊत, नगरसेविका सौ. प्रिया सिरसाट, मा. आश्विनभाऊ शिरसाट, रविभाऊ गोतमारे तसेच गुड मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांनी भेट देऊन काकडा आरतीमध्ये सहभाग नोंदविला.
या वेळी भेट देणाऱ्या सर्व मान्यवरांचा श्री कर्ता हनुमान मंडळाच्या वतीने सन्मान करण्यात आला.
सेवाधारींचा सत्कार व महाप्रसाद,
या धार्मिक उपक्रमाच्या सांगता सोहळ्याप्रसंगी श्री. रमेशरावजी शेरेकर यांच्या वतीने महिनाभर नियमित सेवा देणाऱ्या सेवाधारींचा शाल, श्रीफळ व रोख पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला. तसेच ह.भ.प. प्रकाशभाऊ कुलट यांच्यातर्फे उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती.
महिनाभर चाललेल्या या धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमाची कार्तिक पौर्णिमेला भव्य दिंडी, आरती व विविध धार्मिक कार्यक्रमांनी भक्तिमय वातावरणात सांगता झाली. भारतीय संस्कृती, धार्मिक परंपरा, सामूहिक भक्तिभाव आणि सामाजिक एकोपा जपण्याचे कार्य श्री कर्ता हनुमान मंडळाने यंदाही यशस्वीपणे केले.
Post Views: 9