पूणे .....जि प प्राथमिक शाळा डेहणे येथे शिक्षक दिन साजरा करण्यात आला. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन स्वतंत्र भारताचे दुसरे राष्ट्रपती यांचा 5 सप्टेंबर हा जन्मदिवस शिक्षक दिवस म्हणून केला जातो. आंतरराष्ट्रीय किर्तीचे, भारतीय तत्त्वज्ञानी, थोर शिक्षण शास्त्रज्ञ म्हणून त्याची यांची होती पाच सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून 1956 पासून साजरा केला जातो शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या केंद्रातील शिक्षकांचा यानिमित्ताने केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.भरतराव लोखंडे यांनी शिक्षकांना भेटवस्तू व लेखणी देऊन त्यांचा गौरव केला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान निवृत्त प्राथमिक शिक्षक म्हणून ज्यांनी आयुष्य खर्चीक घातले असे आदरणीय गुरुवर्य श्री.नामदेवजी वाजे (गुरुजी)यांनी केले. प्रसंगी केंद्रातील श्री विजयकुमार शेटे व श्री.सूर्यकांत केंगले यांची भाषणे झाली. शिक्षकांप्रती प्रेम, आदर, आपुलकी म्हणून कार्यक्रम घ्यायचे मनात ठरविले होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.विशाल शिंदे व आभार श्री.ज्ञानेश्वर दुंडे यांनी मांडले.
Post Views: 245