ज्येष्ठ गुरूदेव प्रचारक काशीराव वामनराव गावंडे यांचे निधन
एक तत्त्वचिंतक ज्येष्ठ गुरूदेव तत्व प्रचारक हरवले...!
अकोला- महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य,कादंबरीकार व लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेचे केंद्रीय मार्गदर्शक पदाधिकारी श्री.पुष्पराजजी गावंडे यांचे वडील अकोला जिल्ह्यातील सर्वात ज्येष्ठ गुरूदेव सेवक,सेवा मंडळाचे प्रचारक श्री काशीरामजी गावंडे यांचे दि.२६ फेब्रूवारीच्या रात्री १० वाजून ४० मिनीटांनी दु:खद निधन झाले.मृत्यूसमयी त्यांचे ९२ वर्षे होते.
अकोला आश्रमात दि.३० जानेवारी रोजी साजरा झालेला शेवटचा वाढदिवस.
अ.भा.गुरूदेव सेवा मंडळाच्या उपक्रमांमध्ये त्यांचा महत्वपूर्ण सहभाग होता.वयाच्या १४ व्या वर्षांपासून राष्ट्रसंतांचे प्रत्यक्ष आशीर्वाद घेऊन त्यांनी आपल्या ध्यान,प्रार्थना अशा नैमित्त्यिक साधनेला सुरूवात केली होती.ते कडक साधनेत जीवन व्यतित करणारे एकनिष्ठ गुरूदेव सेवक होते. राष्ट्रसंतांच्या मुर्तिजापूर तालूक्यातील कानडी येथील संस्कार शिबीरात सहभागी होऊन त्यांनी आपल्या गुरूदेव सेवा,साधनेला सुरूवात केली होती.३० वर्षांपासून अकोला येथील गुरूदेव आश्रमात ध्यान आणि प्रार्थना हा त्यांचा नित्त्यक्रम होता.गेल्या ३० जानेवारीला आश्रमात त्यांचा त्यांचा साजरा झालेला वाढदिवस हा शेवटचा ठरला.दि.२७ फेब्रू. रोजी १२.०० वाजता त्यांचे गावी बहिरखेड येथे त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले.येत्या ३ मार्चला दुपारी ३.०० वाजता त्यांना मौन श्रध्दांजली आणि ग्रामगीता वाचन व सामुदायिक प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले आहे.या श्रध्दांजली कार्यक्रमाला सर्व गुरूदेव सेवकांनी उपस्थित रहावे असे आवाहन गुरूकुंज चे केन्द्रीय सदस्य श्री भानुदास कराळे यांनी केले आहे.
स्व.काशीरामजी गावंडे हे अकोल्यातील बहिरखेड येथील रहिवाशी होते. शुण्यापासून सुरूवात करणाऱ्या या तत्त्वचिंतक गुरूदेव सेवकांचा शेती हा व्यवसाय होता.त्यांचे पश्चात मोठे सूपूत्र उद्धवराव गावंडे,पुष्पराज गावंडे व दोन मुली आणि नातवंडं असा आप्तपरिवार आहे.
Post Views: 145