काळाच्या पटलावर अमीट ठसा उमटवणारे व्यक्तिमत्व भाई अण्णासाहेब गव्हाणे -कवी प्रा. इंद्रजीत भालेराव
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
23 Apr 2026, 1:48 PM
परभणी (जि. प्र.) - अनेक संतांनी मांडलेल्या शेतकऱ्याच्या प्रश्नांचा धागा पकडत शेती मातीत राबणारे आणि शेतकऱ्यासाठी आंदोलन करणारे विचारांचे पक्के लढवय्ये म्हणजे मराठवाडा केसरी कै.भाई अण्णासाहेब गव्हाणे यांचा काळाच्या पटलावर अमित ठसा उमटवणारे व्यक्तिमत्व म्हणून महाराष्ट्राला परिचय आहे. असे प्रतिपादन कवी प्रा. इंद्रजित भालेराव यांनी केले.
मराठवाडा केसरी कै. भाई अण्णासाहेब गव्हाणे प्रतिष्ठान, परभणी आयोजित भाई अण्णासाहेब गव्हाणे स्मृती व्याख्यानमालेचे पहिले पुष्प कवी प्रा. इंद्रजीत भालेराव यांनी शोध शेती संस्कृतीचा या विषयावर विचार मांडले. महात्मा फुले विद्यालय जिंतूर रोड वरील प्रांगणात दि. १८/४/२०२६ रोजी कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री गणेशराव दुधगावकर तर प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ विधिज्ञ अँड. अशोक सोनी, माजी आमदार अँड विजयराव गव्हाणे, भीमराव हत्तीअंबिरे, शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे, हवामान तज्ञ पंजाब डख, रविराज देशमुख, स्वराजसिंह परिहार, दादासाहेब नाईकवाडे मनपा सदस्य अक्षय देशमुख, दादासाहेब देशमुख दशरथ तुपसुंदर अजयराव गव्हाणे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात भाई अण्णासाहेब गव्हाणे यांच्या प्रतिमा पुजन व दिप प्रज्वलनाने झाली. स्वागतगीत मोहन आल्हाट यांनी सादर केले. प्रास्ताविक मा. आ. विजयराव गव्हाणे यांनी केले. याप्रसंगी महु येथील भीमरत्न पुरस्कार प्राप्त भीमराव हत्तीअंबिरे, व मानद डिलीट पदवी प्राप्त दशरथ तुपसुंदर तर रमेश नाईकवाडे सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला.
यावेळी कथाकार राजेंद्र गहाळ यांच्या कोंडी, दोन एकर आणि पोशिंदा या तीनही कथासंग्रहाची दुसरी आवृत्ती पुणे येथील डॉ. दीपक चांदणे यांच्या प्रतिमा पब्लिकेशन्सने प्रकाशित केली. या तीनही पुस्तकाचे कवी प्रा. इंद्रजीत भालेराव व मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
स्त्री हीच शेती संस्कृतीचा शोधाची जननी आहे. वेदांच्याही अगोदरच्या काळापासून शेतीचा शोध लागला असल्याचे निष्पन्न झाले असून एकदम सुरुवातीच्या काळात मारून खाण्याऐवजी पेरून खायला सुरुवात केली तेथूनच शेती संस्कृतीची सुरुवात झाली. या शेती संस्कृतीची जीरणी मात्र स्त्रीच आहे असे प्रतिपादन कवी इंद्रजीत भालेराव यांनी केले. मराठवाडा केसरी कै. भाई अण्णासाहेब गव्हाणे प्रतिष्ठानच्या वतीने भाई अण्णासाहेब गव्हाणे स्मृती व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफतांना ते बोलत होते.
वेदांच्याही अगोदर शेती संस्कृतीला सुरुवात झाली असली तरी वैदिक काळात शेती बाबत सविस्तर विवेचन पाहावयास मिळते यानंतर रामायण महाभारत अधिकारातही शेतीचे वर्णन आलेले आहे। पराशर व कश्यप ऋषींनी शेतीवर ग्रंथ पण लिहिलेले आहेत असेही ते म्हणाले.
बुद्धकाळात समृद्ध शेती पाहावयास मिळते शेतकरी ही सुखी असल्याचे या काळात असल्याच्या नोंदी आहेत त्यानंतरच्या हाल सातवाहन काळातही गाथा सप्तशती ग्रंथातून शेती बाबत विवेचन आहे.
संत चक्रधरांपासून संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत एकनाथ महात्मा फुले विठ्ठल रामजी शिंदे आगरकर साने गुरुजी आदींचे लेखनामध्ये शेतीबाबत विचार आलेले आहेत. असे सांगत त्या त्या काळातील शेतीबाबत अतिशय ओघवत्या शैलीत शेती संस्कृतीचा शोध त्यांनी मांडला..
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शिवाजी विरसे यांनी तर आभार प्रदीप चव्हाण यांनी मानले
कार्यक्रमासाठी ॲड. किरण दैठणकर,विठ्ठल तळेकर, रामेश्वर शिंदे लिंबाजीराव भोसले, समाजसेविका राणुबाई वायवळ, विठ्ठल कांगणे, विलास पानखडे, डॉ. भीमराव खाडे, केशव अण्णा दुधाटे, डॉ. सुनील जाधव, राजेंद्र वडकर, बालाजी मोहिते, सिद्धार्थ भराडे, कैलास गव्हाणे, गजानन लव्हाळे, चंद्रकांत चापके,गो. द. पहिनकर, नवनाथ जाधव,बापुराव सुर्यवंशी, नाट्यकर्मी त्र्यंबक वडसकर, माणिक रासवे, बाळासाहेब काळे, बबन आव्हाड, डॉ. सखाराम कदम, कवी हनुमान व्हरगुळे, प्रा. सचिन खडके तसेच राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे परभणी जिल्हाध्यक्ष अजयराव गव्हाणे,प्राचार्य तुळशीराम वानरे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष कथाकार राजेंद्र गहाळ, उपाध्यक्ष विलास चट्टे, सचिव रमेश नाईकवाडे, सहसचिव सौ. गिताजंलीताई गव्हाणे, कोषाध्यक्ष लखनसिंह जाधव, संचालक मंडळ कैलास लोनसने, शिवाजी विरसे, प्रदिप चव्हाण, अमोल क्षीरसागर, सौ. समृद्धी चव्हाण, मोहन आल्हाट, व महात्मा फुले शिक्षण संस्थेचे शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी अथक परिश्रम घेतले.
Post Views: 1