प्रभातच्या अनयचा राष्ट्रीय अ‍ॅरोबिक्समध्ये डंका!


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  02 Nov 2026, 3:48 PM
   

अकोला : सीबीएसई राष्ट्रीय अ‍ॅरोबिक्स स्पर्धेत प्रभात किड्स स्कूलचा विद्यार्थी अनय तायडे याने उल्लेखनीय कामगिरी करत कांस्यपदक पटकावले. पुणे येथील एस.एन.बी.पी. इंटरनॅशनल स्कूलमध्ये २६ ते ३१ ऑक्टोबर २०२६ दरम्यान ही स्पर्धा पार पडली.
स्पोर्ट्स अ‍ॅरोबिक्स प्रकारात अनयने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत तिसरा क्रमांक मिळविला. त्याच्या या यशामुळे अकोला जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
अनयच्या या यशाबद्दल प्रभात किड्स स्कूलचे संचालक डॉ. गजानन नारे, सौ. वंदना नारे, सचिव नीरज आवंडेकर, प्राचार्य वृषाली वाघमारे, उपप्राचार्य अर्चना बेलसरे, समन्वक मो. आसिफ, क्रीडा विभागप्रमुख स्वप्निल मांदाळे व उपक्रीडा विभागप्रमुख आशिष बेलोकार यांनी त्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

    Post Views:  41


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व