कारंज्यातील जे.सी.हायस्कूल मिञमैत्रीणींच्या ४४ वर्षानंतरच्या मैत्रीचा झाला पुर्नजन्म


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  25 Sep 2023, 6:41 PM
   

जीवनाच्या धावपळीत शिक्षण, नोकरी, बदल्या, मुला मुलींची लग्न, नातवंडांचे लाड मी आणि माझं इत्यादी त माणूस एवढा व्यस्त होतो की जूने मिञमैञिणी, नातेवाईक यांच्या पासून तो दुरावतो. उतरत्या वयात त्याच्या सर्व जबाबदाऱ्या पूर्ण झाल्यामुळे त्याला आपली जुनी मित्रमंडळी, नातेवाईक यांच्या सारख्या आठवणी येत राहतात. त्यानंतर तो जवळच्या चार दोन मित्रांना फोन करून एकमेकांची विचारपूस करतो. त्यांना भेटण्याची गरज वाटू लागते. त्यातूनच मग एखाद्याला गेट-टुगेदर करण्याची कल्पना सुचते. तशीच कल्पना जिनवरसा चवरे हायस्कूल व ज्युनिअर काॅलेज कारंजा लाड येथील  सुवर्ण जयंती वर्षी हायस्कूलचे विद्यार्थी  रोटेरीयन संजयजी हेडा  आणि त्यांचे मिञमैञिणींना सुचली. त्यांनी  दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांशी संपर्क व संवाद साधून दोन दिवसीय स्नेहसम्मेलन नुकतेच दि 09 व‌ 10 सप्टेंबरला कारंजा लाड येथे महेशभवन व शाळेत अतिशय आनंदात व न भूतो न भविष्यति अशा  उत्साहात संपन्न झाले. सहभागी चिरतरुण 95 वर्गमित्र - मैत्रीणीं ह्या 60 ते 63 वयोगटातील असून तब्बल 44 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधी नंतर प्रथमच एकत्र आले होते. 

 95 वर्षांपूर्वी  स्व.ऋषभदाससावजी चवरे यांना तत्कालीन ब्रिटीश कमिश्नरने ,पर्याय दिला , कारंज्यात तालुका पाहिजे की  उच्च माध्यमिक शाळा पाहिजे. तेव्हा समयसूचक दूरदृष्टीने त्यांनी  तत्काळ उत्तर दिले, माझ्या मुलांना शिक्षणच पाहिजे. 95 वर्षांपासून  जे.सी. हायस्कूल, कारंजा येथे ज्ञानदानाच्या पवित्र हेतुने अविरत कार्यरत आहे.स्नेहसंम्मेलनाच्या पहिल्या दिवशी सकाळी बालभोग सेवना नंतर दहा वाजता दीपपूजन, सरस्वती वंदनाने सोहळा सुरु झाला. संस्थेचे विश्वस्त,आजी-माजी मुख्याध्यापक, तत्कालीन गुरुजन आणि कर्मचारी गणांचा स्वागत, सत्कार स्मृतिचिन्ह देऊन कृतज्ञतेने साजरा झाला. मान्यवरांचे बहुमूल्य मार्गदर्शनाने सर्व विद्यार्थी उपकृत झाले.
प्रातिनिधीक स्वरुपात विद्यार्थ्यानी पण गुरुजनांचे चरणी मनोगत सेवा सादर रुजु केली. मनोगत व्यक्त करताना शाळेच्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी शाळेप्रति कृतज्ञता व्यक्त केली. आम्ही जे काही आहोत ते शाळेमुळेच! अशी प्रत्येकाची भावना होती. सर्वांनी  एकमताने अभिवचन दिले.  आम्ही चालवू हा पुढे वारसा कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष श्री देवकुमारजी सावजी चवरे, उपाध्यक्ष श्री प्रदीपजी चवरे सर्वश्री अमल चवरे ,शशिकांत चवरे ,शिरिष चवरे, डॉक्टर शार्दुल डोणगावकर,उदय नांदगावकर,मु.अ.चंन्दकांत गवाणकरी, विनोद दर्यापूरकर, विनायक वडतकर, देशपांडे सर, भगवान इंगळे सर गजकुमार गवाणकरी, चौधरी सर,दिनकर तुरकाने, सुभाष राळेकर, जगदीश चवरे यादी मान्यवर उपस्थित होते.
 दुपारी,  जीवनसाथी सह   परिचय सत्र गमती-जमतीने खूपच रंगले. रंगारंग विविध गुणदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रमात तर संगीताची  बहारदार मैफील रंगली आणि शेवटी  मित्र संतोष चव्हानने सादर केलेल्या जंजीर चित्रपटातील  यारी हैं ईमान मेरा यार मेरी जिंदगी  या कव्वाली वर तर सगळ्यांनीच प्रवेश करुन,नृत्याचा असा ताल धरला की महेश भवनाच्या वेळ मर्यादेचे भान राखुन  आवरते घ्यावे लागले.
दुस-या दिवशी शाळा भेट, संस्थेचे विद्यार्थी व आमचे वर्गमित्र, माजी सचिव आणि विद्यमान  कोषाध्यक्ष श्री शिरीष चवरे यांचेसह आजी माजी अध्यक्ष  सचिव व समस्त ट्रस्टींनी शाळेत अमूलाग्र हायटेक घडवलेला बदल,  आधुनिक वाचनालय करण्यासाठी सौ. रेखाताई चवरे यांचे यशस्वी प्रयत्नांची फलश्रुती पाहून सगळे माजी विद्यार्थी विद्यार्थिनी  भारावून गेले व अतिशय आनंदी झालेत. याप्रसंगी जे विद्यार्थी 1979 मध्ये मेरीट आले / शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.  ग्रंथालयासाठी माजी विद्यार्थ्यांकडून ३१००० रुपये ग्रंथालयाची उन्नती घडविणाऱ्या संचालिका म्हणून रेखाताई चवरे यांना हस्तांतरित करण्यात आले व साधारणतः २५००० रुपये बक्षीस रक्कम  ५१००० ₹ची स्वीकृती प्राप्त  आली आहे. कार्यक्रमाच्या शेवटी ये दोस्ती हम ना तोडेंगे हे गीत गाऊन संतोष चव्हाण ने अतिशय उत्साही वातावरण निर्माण केले. कार्यक्रमास चार तास उशीर होऊनही कोणीही कार्यक्रम सोडून गेले नाही हीच कार्यक्रमाची यशस्वी सांगता म्हणता येईल. विद्यार्थ्याचे मनोगत आणि स्मृतिचिन्ह वितरणाने कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली.

    Post Views:  99


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व