माळवी सोनार समाज संघातर्फे संत शिरोमणी श्री नरहरी महाराज जयंती साजरी
समाजातील गुणवंतांचा सत्कार व संस्था चा स्थापना सोहळा साजरा
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
31 Aug 2023, 10:14 AM
अकोला : सोनार समाजाचे आराध्यदैवत संत शिरोमणी श्री नरहरी महाराज यांच्या तिथीप्रमाणे जयंती प्रथमच अकोला येथील माळवी सोनार समाज संघातर्फे अमृतवाडी सभागृहात उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी माळवी सोनार समाजातील गुणवंतांचा सत्कार व संस्थाचा स्थापना सोहळा साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सदानंद भुसारी, प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. स्वाती बैचवाल, बुलडाणा येथील श्रीराम उज्जैनकर, बदलापूर येथील रमेश उज्जैनकर, शिवचरण उज्जैनकर फाऊंडेशनचे शिवचरण उज्जैनकर, माळवी सोनार समाज अकोला अध्यक्ष अशोक उंबरकार व सचिव निलेश मनोहर सोनी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी अध्यक्षीय भाषणात डॉ. सदानंद भुसारी यांनी विविध उदाहरणे देवून समाजाला मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. संस्थाची संकल्पना व अस्तित्व निर्माण यात्राचा उल्लेख सचिव निलेश मनोहर सोनी यांनी सादर केला. समाजाचे अध्यक्ष अशोक उंबरकार यांनी संस्थेची भूमिका विषद केली. प्रास्ताविक आशीष बडोकार यांनी केले. अमोल मोहोकार यांनीही आपले विचार व्यक्त केले. यावेळी सर्व उपस्थितांना नरहरी महाराजांची प्रतिमा भेट देण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते विविध गुणवंतांचा प्रमाणपत्र व स्मृतचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. तसेच संघटनेद्वारा आयोजित आरोग्य शिबिरामध्ये राजराजेश्वर कॉम्प्युटराईज क्लिनीकद्वारे रक्तगट तपासणी व डॉ. स्वाती बैचवाल यांनी कान, नाक, घसा तपासणी केली. यावेळी श्रृती बुडखले हिच्या मार्गदर्शनात सांस्कृतीक कार्यक्रमात चिमुकल्यांनी आपली कला सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी अध्यक्ष अशोक संपतराव उंबरकार, सचिव निलेश मनोहर सोनी, कोषाध्यक्ष अमोल अवधुत मोहोकार, उपाध्यक्ष- संदीप सुभाष बुडुखले, आशिष हरिदास बडोकार, सहसचिव -प्रशांत रामकृष्ण हिरळकर, अमोल कैलास अनासने, सदस्य - गजानन प्रल्हाद बुडखले, गोपाल गोविंदराव तारापुरे, महेंद्र रामदास राऊतराय, सुर्यकांत नामदेव बुडखले, सुमीत रमेश रत्नपारखी, रुपेंद्र पांडुरंग मोहोकार, संजय नामदेव सोनार, नितीन हरिचंद्र मुंदोकार, राजेंद्र रामदास बुडुखले, राहुल वासुदेव तारापुरे यांच्यासह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते. यावेळी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुर्यकांत नामदेव बुडखले यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रशांत हिरळकर यांनी मानले.
Post Views: 220