न्यू महसुल कॉलनी येथे धम्मचक प्रवर्तन दिन उत्साहात


प्रगतीसाठी संघटीत होणे गरजेचे: जे.जी.वाहुरवाघ यांचे प्रतिपादन
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  24 Oct 2026, 8:10 AM
   

अकोला :  समाजाला प्रगतीपथावर न्यायचे असेल तर सर्वांनी एकजूट व संघटीत असणे गरजेचे आहे, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला ‘शिका, संघटीत व्हा व संघर्ष करा’ असा मोलाचा संदेश दिलेला आहे, त्यानुसार आपले आचरण असणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन महसूल गृह निर्माण सोसायटीचे अध्यक्ष जे.जी. वाहुरवाघ यांनी बोलतांना व्यक्त केले. खडकी विभागातील न्यु महसुल कॉलनी येथे ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा केला. प्रमुख अतिथी म्हणून से.नि. तहसीलदार आत्माराम तेलगोटे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये अंबादास तेलगोटे, शैलेश अवचार होते. यावेळी विहाराला रांगोळीने सुशोभीत करणार्‍या प्रियल वाहुरवाघ, विशाखा सोनोने, श्रद्धा खंडारे, संपदा वाकोडे यांना सन्मानित करण्यात आले. विहाराची नियमीत देखभाल करणारे रामकुमार खंडारे गुरुजी, सुभाष सोनोने, उपाध्यक्ष वासुदेवराव चक्रनारायण यांचाही यथोचित सत्कार करण्यात आला. श्रद्धावान उपासिका मिराताई चक्रे यांना पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल व इंदूताई खंडारे यांनी रमाईची मूर्ति दान दिल्याबद्दल तसेच नियमीत ग्रंथ प'णास येणार्‍या शकुंतला वाकोडे, 'ठोंबरेताई, सुमनताई सोनोने, दादाराव वाहुरवाघ यांनाही सन्मानित करण्यात आले.  ग्रंथालय अधिकारी अजय शिरसाट व मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाला शास्त्री चक्रनारायण, विशाल पर्वतकर,रामदास चक्रनारायण, अंबादास तेलगोटे, भारत 'ठोंबरे, सुधीर सराटे,  मनिष गवई, सिद्धार्थ गवई, विश्वजीन चकवारायण,शैलेश  अवचार, अमोल चकनारायण, दिनेश रा. सरदार, रुपेश मनोहर डोंगरे, साहित्यिक पंजाबराव वर,वासुदेव चक्रनारायण,  प्रकाश दामोदर, ओरा चक्रेसर, ज्ञानदेव खंडारे, दिनेश सोनोने, सुरेखा सोनोने, मीना बाबाराव शिरसाट,  कमल वाहुरवाघ, शिल्पा अवचार, मालता ठोंबरे, ज्योती इंगळे, दिनेश सरदार, मिना सरदार,  शोभा  इंगळे, प्रमीला मनोहर डोंगरे, निर्मलाताई तेलगोटे, नारी ललकारच्या कार्यकारी संपादीका सुनंदा पंजाबराव वर,श्रीमती सुमनताई सोनोने,  अनिता सराटे, सुरेखा  जंजाळ, संपदा सुमेध वाकोडे, ओवी विशाल पर्वतकर, अ‍ॅड. अमोल चक्रे, अ‍ॅड. विजय वानखडे, अ‍ॅड. प्रज्ञा चक्रनारायण,प्रमोद इंगळे, माला वाकोडे, कमाना वि. पर्वतकर, रंजना सिरसाट, निता चक्रनारायन, गायिका मिनाताई जामनिक, शिल्पा सानोने, अश्लेषा  पर्वतकर,  सुजाता विजय वाकोडे,  सुरेश खंडारे,पूर्णाजी जंजाळ, श्रध्दा  खंडारे, कल्पना खंडारे, करुणा वानखडे, कमल चक्रनारायण, पुजा वानखडे, वैशाली  वानखडे, विमल सोनोने, शोभा चक्रनारायन आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक खंडारे गुरुजी, संचालन पंजाबराव वर तर आभार ओरा चक्रे यांनी मानले. सर्वांना मि'ाई व अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली.

    Post Views:  35


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व