डॉ. संजय डी. पाटील यांना आउटस्टँडिंग लीडरशीप अवॉर्ड


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  12 Jul 2022, 11:54 AM
   

कसबा बावडा - कोल्हापूर : डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांना आर्डोर-कॉम मिडिया ग्रुपच्या वतीने  आउटस्टँडिंग लीडरशीप इन हायर एज्युकेशन २०२२ हा  प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाला आहे. शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य, नाविन्यपूर्ण प्रयोग व संशोधन कार्याला दिलेल्या पाठबळाची दखल घेऊन डॉ. संजय डी. पाटील यांची या पुरस्कारासाठी निवड झाली असून बेंगळूर येथे १५ जुलै रोजी या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
    आर्डर-कॉम मिडिया हा देशातील मिडीया क्षेत्रात वेगाने विस्तारणारा ग्रुप आहे.  या ग्रुपच्यावतीने हायर एज्युकेशन अँड इडीटेक कॉन्क्लेव अँड अवार्ड २०२२ चे आयोजन करण्यात आले आहे.  शुक्रवार १५ जुलै रोजी बेंगळूर येथील द चान्सेरी व्हेलीयन हॉटेल येथे देशभरातील ख्यातनाम शिक्षण तज्ञांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा रंगणार आहे. यामध्ये  शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांना प्रतिष्ठेच्या आउटस्टँडिंग लीडरशीप इन हायर एज्युकेशन २०२२ ने गौरविले जाणार आहे. 
‘डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटी अभिमत विद्यापीठ, कोल्हापूर, डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ, तळसंदे-कोल्हापूर आणि डी. वाय. पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, आकुर्डी-पुणे या तीन विद्यापीठांचे कुलपती म्हणून डॉ. संजय डी. पाटील कार्यरत आहेत. मेडिकल, इंजिनीअरिंग, पॉलीटेक्निक, ग्रीकल्चर, ग्रीकल्चरल इंजिनीअरिंग, आर्कीटेक्चर, फार्मसी, नर्सिंग, फिजिओथेरेपी, हॉस्पीटॅलिटी कॉलेज, विविध शाळा, महाविद्यालये अशा १७२ संस्था त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहेत.  त्याचबरोबर मेडिकल, इंजिनीअरिंग व ग्रीकल्चरल क्षेत्रात संशोधनात्मक कार्यही सुरु आहे. शिक्षण व संशोधन क्षेत्रात डॉ. पाटील यांनी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. 
अनेक पुरस्कारांचे मानकरी :  डॉ. संजय पाटील यांनी विविध क्षेत्रांमध्ये दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना आत्तापार्यंत वनश्री पुरस्कार, कोल्हापूर भूषण,  राष्ट्रीय शिक्षण सन्मान,  कृषीनिष्ठ पुरस्कार,  इंदिरा प्रियदर्शनी वृक्षमित्र अवार्ड, विद्याभारती अवार्ड, कोहिनूर ऑफ इंडिया अवॉर्ड,  राष्ट्रीय विद्या सरस्वती पुरस्कार,  नॅशनल एज्युकेशन लीडरशिप अवॉर्ड,  भारत गौरव अवॉर्ड अशा अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. तंत्र शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल आयएसटीई नवीदिल्ली जीवनगौरव पुरस्कारानेही  डॉ. पाटील यांना सन्मानित करण्यात आले आहे. उच्च शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी जाहीर झालेल्या या पुरस्काराबद्दल डॉ. संजय पाटील यांच्यावर विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

    Post Views:  268


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व