लोकस्वातंत्र्यचे ३ वर्षातील नियमित उपक्रम गौरवास्पद
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंचा विचारमंथन मेळाव्यात अतिथींचे प्रतिपादन....१५ पत्रकारांचा संघटनेत प्र
अत्त्याचारग्रस्त महिला, शहिद जवान,आत्महत्याग्रस्त शेतकरी,आपत्ती आणि अपघातग्रस्तांना श्रध्दांजली!
अकोला - साडेतीन वर्षापूर्वी स्थापना होऊन गेल्या ३६ महिण्यापासून नियमितपणे पत्रकार कल्याण आणि सामाजिक उपक्रम राबवित पत्रकारांना न्याय देण्यासाठी कृतीशील कार्यक्रम राबविणाऱ्या लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाची वाटचाल ही गौरवास्पद आहे.असे प्रतिपादन महासंघाच्या मासिक विचारमंथन मेळाव्यात उपस्थिती अतिथींनी केले.
संघटनेच्या व्दितीय अभियानातील १० वा व सलग ३६ वा नियमित विचारमंथन मेळावा नुकताच स्थानिक जठारपेठेतील जैन रेस्ट्रो येथे संपन्न झाला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शासनाच्या साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य व लोकस्वातंत्र्यचे केन्द्रीय मार्गदर्शक पदाधिकारी पुष्पराज गावंडे होते.तर ऑयकॉन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे मुख्य प्रशासकीय अधिकारी संजीवबाप्पू देशमुख,अकोला जिल्हा स्त्री रूग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी आप्पासाहेब डामरे हे प्रमुख अतिथी म्हणून, तर अॕड.राजेशजी कराळे, अॕड. नितीनजी धुत, लोकस्वातंत्र्यचे संस्थापक - राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम देशमुख,व रोटरीचे माजी अध्यक्ष अशोकुमार पंड्या यांची विचारमंचावर प्रमुख उपस्थिती होती.यावेळी प्रमुख अतिथींचे शाल,पुष्पगुच्छ व आप्पासाहेब डांबरे यांना सन्मानपत्रासह सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमात नारी ललकार संपादक व एका संघटनेचे जिल्हाध्यक्ष पंजाबराव वर यांचेसह १५ पत्रकारांनी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघात प्रवेश केला.त्यांचे संघटना अध्यक्ष संजय एम.देशमुख व अतिथींच्या हस्ते स्वागत करण्यात आले.याप्रसंगी सर्वप्रथम संघटनेच्या सामाजिक सेवेचे अधिष्ठाण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा यांना वंदन अभिवादन करण्यात आले.त्यानंतर कोलकाता,मराठवाडा व ईतर अत्त्याचारात बळी गेलेल्या महिला,शहिद जवान,आत्महत्त्याग्रस्त शेतकरी व आपत्ती आणि अपघातातील बळींना श्रध्दांजली वाहण्यात आली.संजय देशमुख यांनी पत्रकारांच्या अडचणीबाबत अॕडीशनल प्रेस जनरल यांचेसोबत दिल्ली येथे केलेली चर्चा,निवेदन आणि जाहिराती कल्याण योजनांबाबतित राज्य सरकारकडे केलेल्या मागण्यांची माहिती दिली.लढा यशस्वी होण्यासाठी लहान - मोठा पत्रकार हा भेद आणि मनातील दुराग्रह बाजुला ठेऊन संघटीत होण्याचे आवाहन पत्रकारांना यावेळी केले.पुष्पराज गावंडे यांनी अध्यक्षिय भाषणातून व राजेन्द्र देशमुख यांनी संघटनेच्या यशस्वी वाटचालीची माहिती दिली.
या कार्यक्रमाला राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रदिपजी खाडे,किशोर मानकर,सचिव राजेन्द्रबाप्पू देशमुख,कोषाध्यक्ष सिध्देश्वर देशमुख,अंबादास तल्हार,विदर्भ संघटक डॉ.शंकरराव सांगळे लोकस्वातंत्र्य सामाजिक सेवा संघ जिल्हाध्यक्ष संजयबाप्पू कृ.देशमुख,सौ.दिपाली बाहेकर, सौ.सोनल अग्रवाल,नानासाहेब देशमुख,मनोहर मोहोड, के.व्ही.देशमुख, वसंतराव देशमुख,पंजाबराव वर,रमेश समुद्रे,सुरेश पाचकवडे, संजय निकस, अॕड.एम.एस.इंगळे, अॕड.पी.जी.उपर्वट, के.एम.देशमुख, दिलीप नवले,सतिश देशमुख (निंबेकर), के.एम.देशमुख, डॉ.अशोक सिरसाट,गौरव देशमुख,शामभाऊ देशमुख,अॕड.संकेत देशमुख,गजानन मुऱ्हे,कैलास टकोरे, बुढन गाडेकर,विजय देशमुख,संघपाल सिरसाट,एजाज अहमद खान,अजय वानखडे,संतोष मोरे,अनंत महल्ले,पि.एन. जामोदे, आकाश हरणे,पांडूरंग भागळे व ईतर पत्रकार तथा विचारमंथन सभासद उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन सौ.दिपाली बाहेकर यांनी तर संघटनेच्या वाटचालीच्या माहितीसह आभारप्रदर्शन सिध्देश्वर देशमुख यांनी केले.नियमित सहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
Post Views: 172