शिक्षक मतदार संघासाठी आज २६ उमेदवारांचे भाग्य मतपेटीत बंद


विधान परिषद साठी सकाळी ८ ते दुपारी ४ पर्यंत मतदान :२७ ऑक्टोंबर ला निकाल
 Vishwaprabhat  23 Oct 2026, 4:54 PM
   

पीएन देशमुख जि. प्र. अमरावती                

विधान परिषदेच्या शिक्षक मतदार संघासाठी आज२३ ऑक्टोंबर रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत ८१ मतदान केंद्रावर मतदान होईल. यात  २४ हजार ७३२ पुरुष आणि ११ हजार७८ महिला असे एकूण ३५ हजार ८१० शिक्षक मतदार आपला हक्क बजावतील. २६ उमेदवार रिंगणात आहेत यात किरण सरनाईक ( शिवसेना), काँग्रेसच्या आदिती पोहरे देशमुख, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे दिलीप कडू, विजूक्टाचे अविनाश बोर्डे , माजी आमदार श्रीकांत देशपांडे, शिक्षक आघाडीच्या संगीता शिंदे - बोंडे, आणि चंद्रशेखर भोयर यांचा समावेश आहे. अमरावती जिल्हा सर्वाधिक  १० हजार ९७ मतदार आहेत त्यांच्यासाठी २५ मतदान केंद्र असून शहरात५ ठिकाणी ११ केंद्र उभारले आहे. मावळत्या आमदारांचा कार्यकाळ डिसेंबर मध्ये संपला असल्याने ही निवडणूक होत आहे. मतमोजणी 27 ऑक्टोंबर रोजी सकाळी आठ वाजता विद्यापीठ रोडवरील लोकशाही भावना सुरू होईल मतमोजणीसाठी चे पहिले प्रशिक्षण पूर्ण झाले आहे.

    Post Views:  9


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व