प्रभातच्या चार बॉक्सिंगपटूंची विभाग स्तरावर निवड


१२ बॉक्सिंगपटूंचे उत्कृष्ट प्रदर्शन
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  17 Nov 2022, 2:43 PM
   

अकोला : प्रभात किड्स स्कूलच्या १२ खेळाडूंनी जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत नेत्रदिपक कामगिरी केली असून त्यापैकी चार सुवर्णपदक प्राप्त खेळाडूंची विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
     युवक व क्रीडा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धा नुकत्याच स्थानिक वसंत देसाई क्रीडा संकुल येथे जिल्हा क्रीडा समिती आणि जिल्हा क्रीडा कार्यालयाद्वारे  दि. ९ ते ११ नोव्हे. दरम्यान आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत १४ वर्षाखालील मुलांच्या गटात विविध वजनगटातून निखिलेश धबाळे आणि शाश्चत महल्ले यांनी सुवर्णपदक प्राप्त केले; लक्ष तिवारी, वेदांत तायडे व तन्मय बोरकर यांनी रजतपदक तर देवांश ढगे याने कास्यपदक प्राप्त केले.
    १७ वर्षाखालील मुलांच्या वयोगटात यश डोंगरे याने रजतपदक तर रुद्रप्रतापसिंग परमार व क्षितीज राऊत यांनी कास्य पदक प्राप्त केले. तसेच मुलींच्या गटातून गार्गी राऊत हीने सुवर्ण तर अनुष्का मेंढे हीने रौप्य पदक प्राप्त केले. तसेच १९ वर्षाखालील गटातून इयत्ता बारावीचा विद्यार्थी ओम वानखेडे यांनी सुवर्ण पदक प्राप्त केले.
    या सर्व गटातील सुवर्णपदक प्राप्त ४ खेळाडू निखिलेश धबाळे, शाश्चत महल्ले, गार्गी राऊत व ओम वानखेडे यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. खेळाडूंना प्रभातचे बॉक्सिंग प्रशिक्षक राहुल वानखडे, रिया ताराम यांचे मार्गदर्शन लाभले. 
प्रभातच्या प्राचार्य वृषाली वाघमारे, उपप्राचार्य अर्चना बेलसरे व क्रीडा प्रमुख संतोष लोमटे यांनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले असून आगामी विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.   

    Post Views:  444


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व