साहित्याने समाजमने जोडली जातात: संजय देशमुख


मान्यवाराकडून साहित्यिक घुगे बंधूचा नागरी सत्कार
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  06 Oct 2026, 10:22 AM
   

 अकोला : साहित्याने अनेकांना जगण्याच्या सकारात्मक प्रेरणा मिळत असून आर्थिक विकासोबत माणसाकडे विचारांची श्रीमंती असली पाहिजे. साहित्यिक वैचारीक प्रेरणांनी समाजमने जोडण्याचे उदात्त  कार्य करीत असल्याचे  प्रतिपादन लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख यांनी जेष्ठ नागरिक साहित्यिक घुगे बंधूच्या नागरी सत्कारात मार्गदर्शक म्हणून बोलतांना केले . बहुजन साहित्य कलावंत फाउंडेशन व लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या जिल्हा शाखेच्या संयुक्त विद्यमाने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
    आंबेडकरी चळवळीत सातत्याने गेली अनेक वर्षे आपल्या साहित्याचे माध्यमातून समाज जागृतीचे कार्य करणारे कवि अर्जून घुगे यांचा नागरी सत्कार मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष  म्हणून अ‍ॅड. जी.  एस. तेलगोटे (सदस्य : अकोला बार असो.) होते. तर 
  अ‍ॅड. एम.एस. इंगळे, अ‍ॅड. भीमराव इंगळे, शाहीर वसंत मानवटकर, अॕड. राहुल इंगळे (मा  उपाध्यक्ष अकोला बार असो.), रवींद्र गवई, अॕड. विजयानंद डोंगरे उपस्थित होते. यावेळी बाळाभाऊ दाभाडे यांची व इतर मान्यवरांची भाषणे झाली.
        कार्यक्रमाचे आयोजन पंजाबराव वर संस्थापक अध्यक्ष बहुजन साहित्य कलावंत फॉउंडेशन, अकोला,
डी.जे. वानखडे, अ‍ॅड. प्रजानंद उपर्वट, प्रकाश जंजाळ, बाळाभाऊ दाभाडे, रमेश समुद्रे, अमित इंगळे, पत्रकार संतोष मोरे यांनी केले होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी गायक देवानंद गवई, कवी राजेश डोंगरे, सिद्धार्थ तायडे,  प्रकाश अंभोरे, गौतम अंभोरे, गायक नाईक, मिलिंद बन्सोड, गायक शेगोकार, नाल वादक मोहन जामनिक, गायिका मंगलाताई गवई, पत्रकार मधू कसबे  आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक एड. प्रजानंद उपरवट, संचालन पंजाबराव वर यांनी तर आभार प्रदर्शन रमेश समुद्रे यांनी केले.

    Post Views:  8


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व