तांदळी दुमाला येथे अवैध दारू विक्रेत्यांचा सुळसुळाट


पोलिसांची कारवाईसाठी टाळाटाळ
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  15 Sep 2024, 6:34 PM
   

वैभव हराळ- जिल्हा प्रतिनिधी
श्रीगोंदा- तांदळी दुमाला येथे असलेल्या होत अवैध हातभट्टी दारू विक्रीमुळे नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. कित्येक दिवस श्रीगोंदा येथील पोलिस हवालदार राहूल  शिंदे यांना सांगून काहीच कारवाई झालेली नाही.पोलिसांकडून फक्त कारवाई चालू आहे असे स्पष्ट उत्तर दिले जाते. या टोलवाटोलवीमुळे नागरिकांना न्याय मिळत नसून पोलिस कर्मचारी आणि श्रीगोंदा पोलिस स्टेशन विषय नकारात्मक भूमिका पत्रकार आणि युवकांमध्ये निर्माण झाली आहे.  कारवाई कधी होईल हे पोलिसांनी सांगावे. म्हणजे तांदळी दुमाला येथील शिक्षक, विद्यार्थी, पालक यांना दिलासा मिळेल .
    सरकार भाजपचे असतांनाही नियंत्रण का नाही असा प्रश्न तांदळी दुमाला ग्रामस्थांना पडला आहे.कित्येक मुलांचे दारू पाई  मृत्यू झाल्यानंतर कारवाई होईल का? अशा चिंता ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहूत. आवश्यक दक्षता श्रीगोंदा पोलिस घेत नाही म्हणजे काय ?अधिकारी वर्ग स्व:ताला  वाटेल तशा पध्दतीने वागून फायद्यासाठी कारवाई टाळत असतील तर  ती कर्तव्याशी प्रतारणा ठरते.श्रीगोंदा पोलिसांनी जनतेच्या मागणीचा विचार करून या अवैध दारू व्यवसायावर कार्यवाही अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने मनसे उपाध्यक्ष वैभव हराळ यांनी केली आहे.

    Post Views:  372


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व