गांजाची अवैध विक्री, 3 किलो गांजा जप्त


विशेष पथकाची कारवाई; 30 हजाराचा मुद्देमाल जप्त
 संजय देशमुख  29 Jan 2022, 8:33 PM
   

अकोला : जिल्ह्यातील आडगाव बुद्रुक येथे राहत्या घरातून मादक आमली पदार्थ गांजाची विक्री केली जात असल्याने जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने छापेमारी करून आरोपीस अटक केलेल्या आरोपीच्या ताब्यातून 3 किलो गांजासह 30 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आडगाव बु येथे राहत्या घरातून मादक पदार्थ गांजाची विक्री केली जात असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने बरकत बेग लियाकत बेग रा. काझीपुरा त्याच्या राहत्या घरी छापेमारी करून झाडाझडती घेतली असता घरात मादक पदार्थ गांजा असल्याचे आढळून आले. या कारवाईत पथकाने तीन किलो गांजासह तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी बरकत बेग लियाकत बेग रा. अडगाव याच्या विरोधात एनडीपीएस कायद्याच्या कलम 20 बीप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक विलास पाटील व त्यांच्या पथकाने केली.

    Post Views:  303


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व