विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  29 Jun 2022, 9:55 AM
   

अकोला - भारतीय हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून प्राप्त अंदाजानुसार दि.27 जून ते दि.1 जुलै या दरम्यान अकोला जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. काही ठिकाणि 51 ते 75 मि.मी पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. वीज पडणे या अनुषंगाने नागरिकांनी अधिक दक्षता घ्यावी. दामिनी या ॲपचा वापर करुन माहिती घ्यावी. तसेच या इशाऱ्याच्या पार्श्वभुमिवर सर्व यंत्रणांनी योग्य ती दक्षता व खबरदारी घ्यावी असे कळविण्यात आले आहे.

    Post Views:  205


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व