रुग्णसेवक युवावक्ते सौरभ वाघोडे यांची राज्यस्तरीय स्वामी विवेकानंद युवाश्री पुरस्कारासाठी निवड


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  08 Nov 2022, 11:48 AM
   

तेल्हारा तालुक्यातील पंचगव्हान येथील रुग्णसेवक व युवावक्ते सौरभ गणेशराव वाघोडे यांची  तरुणाई फाऊंडेशन अकोला तर्फे दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय स्वामी विवेकानंद युवाश्री पुरस्कार २०२२ या करिता निवड करण्यात आली आहे. जीवन जगत असतांना समाजाप्रती स्वतः ची जबाबदारी ओळखून विशेष कार्य करणाऱ्या युवकांना हा पुष्कर दिला जातो.  सौरभ वाघोडे हे श्री शिवाजी महाविद्यालयाचे विद्यार्थी प्रतिनिधी असून त्यांची लोकभिमुख कार्यात नेहमीच आघाडी असते. त्यांनी आजपर्यंत ३ जिल्हातील जवळपास ४ हजार रुग्णांना रक्तदाते देऊन हजारो रुग्णांचे प्राण वाचविण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. जिल्हा ग्रामीण रुग्णालयामध्ये अन्नदान करणे, गरजू रुग्णांना शक्यती मदत करुन त्यांच्या अडचणी सोडवून त्यांना मायेचा आधार देणे.त्याना प्रत्येक्ष आरोग्याच्या कार्यासाठी मदत करुन त्यांचे अश्रू पुसण्याचे काम करत आहे. महाराष्ट्राचा महावक्ता म्हणून निवड झालेले सौरभ वाघोडे यांनी शिक्षणासोबत समाजप्रबोधन व याच्याच जोडीने रुग्णसेवेचा वसा जपून समाजा समोर वेगळा आदर्श ठेवला आहे. व्याख्यानांच्या माध्यमातून महाराष्ट्रभर खरा इतिहास सांगून जनजागृती करत आहेत.       
     त्यांच्या ह्या संपूर्ण कार्याची दखल घेत अनेक जिल्ह्यांमध्ये त्यांचे तरुणाई फाऊंडेशन तर्फे दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय स्वामी विवेकानंद युवाश्री पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. सदर पुरस्कार हा अकोल्यामध्ये होणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रदान करण्यात येणार असल्याची माहीती तरुणाई फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संदीप देशमुख यांनी दिली आहे.

    Post Views:  165


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व