शरद पवारांच्या हस्ते 95 व्या साहित्य संमेलनाचे उद्घाटन
राष्ट्रपती व केंद्रीय वाहतूक मंत्र्यांच्या उपस्थितीत समारोप
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
04 Apr 2022, 12:05 PM
पुणे : उदगीर (लातूर) येथे 22, 23 आणि 24 एप्रिल रोजी होणार्या 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उदघाटन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. तसेच राष्ट्रपती रामनाथ कोविंद व केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत संमेलनाचा समारोप होणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात येत आहे.
उदगीर येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उदयगिरी महाविद्यालयाच्या प्रांगणात हे संमेलन होणार आहे. संमेलन नगरीला स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे नाव देण्यात आले आहे. लातूर जिल्ह्यात प्रथमच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. संमेलनाला दिग्गज नेते उपस्थि राहणार असल्याचे स्पष्ट झाल्याने संमेलनाच्या तयारीला वेग आला आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष राज्यमंत्री संजय बनसोडे आहेत. तर सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांचीही उपस्थिती संमेलनात असणार आहे.
Post Views: 263