एम.जे.एस. कॉलेजच्या खेळाडूंची विभागीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
13 Dec 2024, 2:15 PM
श्रीगोंदा (प्रतिनिधी) :- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे आयोजित आंतर महाविद्यालयीन पॉवर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाचा साहिल दत्तात्रय सुद्रिक याने ७४ किलो वजन गटामध्ये प्रथम क्रमांक व कीर्ती भरत पवार हिने ५७ किलो वजन गटामध्ये द्वितीय क्रमांक मिळवून उल्लेखनीय कामगिरी केली. या दोन्ही खेळाडूंची सी.डी. जैन महाविद्यालय श्रीरामपूर येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली. ग्रामीण भागातील मुलांचा पॉवरलिफ्टिंग या खेळाकडे कल वाढण्यासाठी या दोन्ही खेळाडूंचे यश प्रेरणादायी ठरेल.
त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयीन विकास समितीचे चेअरमन आमदार बबनराव पाचपुते, रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य राहुलदादा जगताप, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य बाबासाहेब भोस, महावीर पटवा, प्र. प्राचार्य डॉ. महादेव जरे, उपप्राचार्य डॉ. प्रकाश साळवे, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. सुदाम भुजबळ, सायन्स विभाग प्रमुख डॉ.नितीन थोरात, ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य प्रा. शहाजी मखरे व सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या खेळाडूंना शारीरिक शिक्षण संचालिका कल्पना बागुल आणि क्रीडा शिक्षक संजय डफळ व संतोष जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.
Post Views: 52