कळंबेश्वर गावात रात्रीच्या वेळी ड्रोनच्या घिरट्या; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  03 Oct 2026, 9:59 AM
   

अकोला- अकोला तालुक्यातील कळंबेश्वर येथे मागील दोन दिवसांपासून रात्रीच्या वेळी ४ ते ५ ड्रोन आकाशात फिरताना दिसत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे गावातील नागरिकांमध्ये भीती व संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रकरणाची सैनिक किशोर गणेश अडागळे यांनी स्वतः दखल घेत संबंधित यंत्रणांकडे चौकशीची मागणी केली आहे. किशोर गणेश अडागळे हे भारतीय सैन्यातील जवान असून राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित आहेत. कळंबेश्वर गावात रात्रीच्या वेळी ड्रोन फिरत असल्याची माहिती त्यांच्या माध्यमातूनही  संबंधित यंत्रणांना देण्यात आली आहे.
हे ड्रोन नेमके कोणाचे आहेत, रात्रीच्या वेळी गावावरून ते कोणत्या कारणासाठी उडवले जात आहेत, आणि त्यामागील नेमका उद्देश काय आहे, याची सखोल चौकशी करून सत्य परिस्थिती नागरिकांसमोर स्पष्ट करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या संदर्भात पोलिसांना तसेच न्यूज चॅनेललाही माहिती देण्यात आली आहे. नागरिकांमध्ये अनावश्यक भीती निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने तातडीने याची पडताळणी करून योग्य ती माहिती द्यावी.

    Post Views:  144


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व