विद्यापीठ हायस्कूल मध्ये आषाढी एकादशी - विविध कार्यक्रमाद्वारे साजरी


३ किलोमीटर नदीच्या पाण्यामध्ये शोध मोहीम यशस्वी
 विश्वप्रभात  16 Jul 2024, 9:56 PM
   

पुणे - महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या विद्यापीठ हायस्कूल, पुणे. येथे आषाढी एकादशी निमित्त बीजगोळे निर्मिती, ग्रंथदिंडी, वृक्षदिंडी, जलदिंडी अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी पारंपारिक वारकरी पोशाख परिधान करून  वारीचा अनुभव घेतला. वारीचे शास्त्रीय महत्त्व समजावून घेतले. विद्यार्थ्यांनी विठ्ठलाचे अभंग मधुर आवाजात टाळ्यांच्या गजरात म्हंटले  व नृत्य सादर केले. पर्यावरण  जनजागृती निर्माण घोषवाक्यांद्वारे व्हावी यासाठी घोषवाक्याचे फलक, कागदी पिशव्या निर्मिती व त्यांचे वाटप, बीज गोळे निर्मिती व त्याचे रोपण असे विविध पर्यावरण पूरक उपक्रमामुळे या दिंडीस विशेष महत्त्व प्राप्त झाले. याप्रसंगी  मुख्याध्यापक  विष्णू मोरे , शिक्षक प्रतिनिधी गौरी गोळे , स्नेहा वाघमारे, समन्वयक स्मिता जाधव, संध्या आवेकर, वैशाली सैंधाणे ,प्रमोदिनी कबुले, रेश्मा देवकाते, तेजस्विनी निरगुडे ,मनोहर निकम,योगेश्वर  चव्हाण,पल्लवी अभंग,सुप्रिया बीरजे, नंदा काशीद, दीपक अगावणे,पालक व सर्व कर्मचारी उपस्थित होते.

    Post Views:  135


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व