अंगणवाडी सेविकांचा वाशिम जिल्हा दारु बंदी आंदोलनास पाठिंबा
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
2024-01-17
वाशिम :-वाशिम जिल्ह्यामधे अवैध दारुची विक्री गावोगाव मोठ्या प्रमाणात सुरु आहे. शालेय लहान मुलेही दारु व्यसनास बळी पडत आहेत.तर युवकही दारु व्यसनाच्या आहारी जाऊन,त्यांचे गावोगावी मोठ्या प्रमाणात मृत्यू होत आहेत. महिला विधवा होत आहेत,त्यांचे दारुडे नवरे क्रूरपणे मारहाण करुन अत्याचार करीतात, दारु पिण्यासाठी महिलांच्या मजूरी चे पैसे बळजबरीने नेतात,घरातील वस्तूंची विक्री करतात,महिलांचे संसार सर्वतोपरी उध्वस्त होत आहेत,
वाशिम जिल्ह्यासह संपूर्ण सहाराष्ट्रात अवैध व वैध दारुबंद झाली पाहिजे,व दारुड्यांना व्यसनातून काढण्यासाठी मोफत व्यसनमुक्ती केंद्र काढावेत,विधवा महिलांचे पूर्वसन करावे,आदि या मागणीचे निवेदन दारु मुक्ती आंदोलनाचे वतीने वाशिम जिल्हाधिकारी,कारंजा तहसि लदार मार्फत व कारंजा मत दार संघाचे लोकप्रिय आम दार मा.राजेंद्र पाटणी यांना वाई येथे सौ.बेबीबाई पुरुषो त्तम मनवर व महिलांनी दि.१२जानेवारीस दिले, महिलांनी मुख्यमत्री ना. एकनाथ शिंदे यांना दिलेले निवेदनावर वाशिम जिल्ह्या तील शेकडो अंगणवाडी सेविकांनी पाठिंबा दिला व महिलांनी पाठिंबा दर्शक निवेदन दारु मुक्ती आंदोलना चे राज्य संयोजक भाई रजनीकांत यांना सादर केले,व वाशिम जिल्ह्यातील दारुबंदी करण्याचे लढ्यात सर्व सावित्रीचे लेकींनी उतरण्याचा संकल्प जाहिर केला.तसेच सरकारने २५ जाने.पूर्वी वाशिम जिल्ह्यात दारु बंद न केल्यास आक्रोश आंदोलन करण्याचे ठरविले. भाई रजनीकांत यांनी दारु मुक्ती आंदोलनाचे वतीने अंगणवाडी सेविकांच्या मागण्या व आंदोलनास जाहिर पाठिंबा जाहिर केला. यावेळी अंगणवाडी सेविका राज्य समन्वय समितीच्या मा. कौसल्याबाई बेलखोडे, अध्यक्षा,श्रूति कथले,अध्य क्ष,मालेगाव तालुका,वर्षा भुते,उषा देवळे,उज्ज्वला चव्हाण,रेखा शिंदे, सचिव, माला शिंदे,दयाराम भगत, ललिता जाधव,चंद्रकला तुरे,महानंदा मानकर,रेणुका चव्हाण,रंजना देशमुख आदि जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका पदाधिकाऱ्यांनी आपला पाठिंबा निवेदनाद्वारे दिला.
Post Views: 177