जळगाव: राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (nawab malik) यांना अटक झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (ncp) अधिकच आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादीने ठिकठिकाणी आंदोलने सुरू केली आहेत. मलिक यांच्यावरील कारवाई सूड भावनेतून झाल्याचा आरोप करतानाच राष्ट्रवादीने ठिकठिकाणी भाजपच्या निषेधार्थ आंदोलनेही सुरू केली आहेत. जळगावमध्येही महाविकास आघाडीने मलिक यांच्या अटकेचा निषेध नोंदवण्यासाठी जोरदार आंदोलने केली. यावेळी राष्ट्रवादीचे अमळनेरचे आमदार अनिल पाटील (anil patil) यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. चंपाने समोय्यांना हाताशी धरून टरबूजाच्या कितीही खापा केल्या तरी राज्यातील जनतेला टरबूज गोड लागणार नाही, अशी खोचक आणि घणाघाती टीका अनिल पाटील यांनी केली आहे. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी आदी उपस्थित होते.
आमदार अनिल पाटील हे यापूर्वी भारतीय जनता पक्षात होते. त्यांनी गेल्या चार वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अमळनेर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. यावेळी भाजपवर टीका करताना ते म्हणाले की, चंद्रकांत पाटील यांचे यांचे हे षडयंत्र आहे. किरीट सोमय्यांना हाताशी धरून हे सरकार पाडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. कोणत्याही प्रकारे महाराष्ट्र सरकार पाडण्याचा केंद्र सरकारचा अट्टाहास आहे, असं पाटील म्हणाले. मलिक यांच्या पाठी आघाडीतली सर्व आमदार खंबीरपणे उभे असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
3 फेब्रुवारीला एनआयएने दाऊत विरोधात गुन्हा दाखल केलाय. मनी लॉन्ड्रिंग, ड्रग्ज तस्करी तसंच अन्य गुन्ह्यात दाऊदचा सहभाग आहे, असं ईडीचे एएसजी अनिल सिंग यांनी न्यायालयात याची माहिती दिली आहे. इतकंच नाही तर मलिक आणि दाऊद यांच्यात कसे संबंध आहेत, हे देखील त्यांनी न्यायालयात सांगितलं. त्यानुसार दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर दाऊदचा कारभार पाहत होती. तिच्याकडून मलिक यांनी दाऊदची बेनामी संपत्ती विकत घेतल्याचा आरोप करण्यात आलाय.
दाऊदची 200 कोटी रुपयांची संपत्ती कमी किंमतीत विकत घेतली. हा व्यवहार रोखीने झाला. त्यात 55 लाखाचा व्यवहार झाला. मलिक यांच्या कुटुंबाच्या एका कंपनीकडे या संपत्तीची मालकी आहे. या कंपनीवर मलिक यांचा मुलगा संचालक आहे. काही काळ ही कंपनी मलिक यांच्या नियंत्रणाखाली होती, असा आरोप सिंग यांनी कोर्टात केलाय. इतकंच नाही तर कुर्ल्यातील मालमत्ता मरियम आणि मुनिरा या दोघींच्या नावावर करण्यात आली होती. ही जमीन मुळात दाऊद गँगच्या हस्तकांशी संबंधित होती. ही जमीन सलीम पटेलची होती आणि तो अंडरवर्ल्डशी संबंधित होता. ती संपत्ती आता मलिक यांच्या कंपनीकडे आहे, असंही सिंग यांनी म्हटलंय.
Post Views: 238
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay