ऑपरेशन प्रहार अंतर्गत जिल्हा व शहर वाहतूक शाखेची अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्यावर धडक कारवाही


 Vishwaprabhat  29 Sep 2026, 9:31 PM
   

आज दिनांक 28 9 2026 रोजी माननीय पोलीस अधीक्षक अर्चित चांडक साहेब यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक विलास पाटील साहेब पोलीस निरीक्षक जिल्हा व शहर वाहतूक नियंत्रण शाखा अकोला आपल्या पोलीस स्टेशन स्टाफ सह अकोला शहरात चांदेकर चौक येथे नाकाबंदी करीत असताना एक इसम संशयितरित्या  मोटरसायकल (ॲक्सिस१२५ क्रमांक  MH 30 AW 2131) चालवत असताना निदर्शनास आला 
त्याला थांबून मोटरसायकलची पाहणी केली असता मोटर सायकल वर  एका पिवळी पोत्यात काही घेऊन जाताना मिळून त्याची तपासणी केली असता त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले गुटखा , सुगंधित सुपारी , पान मसाला जशे विमल , सीतार , वाह , कालीबहार , नजर मिळून आले त्याला त्याचे नाव विचारले असता त्याने आपले नाव प्रफुल लांडे वय ४१ रा केशवनगर गोरक्षण रोड अकोला असे सांगितले त्याच्या जोडून एक मोटर सायकल व गुटखा , सुगंधित सुपारी , पान मसाला जप्त करण्यात आला असून एकूण 80 हजार रुपयाचा मुद्दामाल जप्त करण्यात आला आहे सदर इसमाविरुद्ध पोलीस स्टेशन सिटी कोतवाली येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे करण्यात आला आहे
सदर कारवाही माननीय पोलीस अधीक्षक अर्चित चांडक साहेब , अप्पर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेडी सर  , उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास पाटील साहेब , पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष गावंडे , पोलीस कॉन्स्टेबल कबीर अन्सारी , ऋषभ शर्मा , उमेश वाघमारे व त्यांच्या सहकार्यांनी केली

    Post Views:  1


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व